राधानगरी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत “निक्षय मित्र” क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करणेबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद म्हणून ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे 10 टीबी रुग्णांना पोषण आहार किट वितरीत करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड यांनी टी बी रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढावी. म्हणून, या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार पुढील सहा महिने या रुग्णांना पोषण आहार दिला जाईल,असे सांगितले तर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.सुनंदा गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर आर शेट्टी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा संदर्भात माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांबळे, सहाय्यक अधीक्षक सुरेश पाटील,मनीषा कौलगेकर,निलोफर हैतवडे,डी आर पाटील,शुभांगी कोले, के डी पाटील, सुनील कांबळे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार दिगंबर कुंभार यांनी मानले.



