spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगआता चांदीलाही हॉलमार्किंग

आता चांदीलाही हॉलमार्किंग

केंद्र  सरकारची १ सप्टेंबरपासून हॉलमार्किंग अमलात आणण्याची घोषणा

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

चांदीच्या दागिन्यांमध्ये भेसळ रोखण्यासाठी केंद्र  सरकारने १ सप्टेंबरपासून हॉलमार्किंग अमलात आणण्याची घोषणा केली आहे. या बदलामुळे, चांदीची खरी शुद्धता समजून येईल आणि ग्राहकांना फसवणूक टाळता येते. या हॉलमार्किंगमध्ये एक ६‑अंकी कोड  HUID (Hallmark Unique Identification Code) लागू होईल. हा कोड चांदीची शुद्धता स्पष्ट करेल आणि दागिन्याची ओळख मजबूत करेल.

१ सप्टेंबर पासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लागू ऐच्छिक केले जाणार आहे. म्हणजे, ग्राहक हॉलमार्क असलेली किंवा न असलेली दागिने खरेदी करण्याचा पर्याय ठेवू शकतील. या हॉलमार्किंगमध्ये एक ६‑अंकी कोड लागू होईल. हा कोड चांदीची शुद्धता स्पष्ट करेल आणि दागिन्याची ओळख मजबूत करेल. भारतीय मानक ब्यूरोने (BIS)  चांदीसाठी खालील ६ शुद्धता स्तर निश्चित केले आहेत:

    • 800, 835, 900, 925, 970, 990 ही श्रेणी चांदीच्या शुध्तेचे प्रमाण दाखवते.   

    • 990:  जर कोणत्याही चांदीच्या दागिन्यांवर ९०० हा आकडा लिहिलेला असेल तर त्याचा अर्थ असा की तो चांदीचा सर्वात शुद्ध प्रकार आहेया आकड्याचा अर्थ असा की चांदी ९९ टक्के शुद्ध आहेअशा चांदीला बारीक चांदी असेही mम्हणतातअशा चांदीचा वापर बार किंवा नाण्यांच्या स्वरूपात केला जातोती खूप मऊ असतेम्हणून ती दागिन्यांमध्ये क्वचितच केली जाते.

    970:जर कोणत्याही चांदीच्या दागिन्यांवर ९७० क्रमांक लिहिलेला असेल तर याचा अर्थ असा की हा दागिना ९७ टक्के शुद्ध आहेअशा चांदीचा वापर दागिने आणि भांडी बनवण्यासाठी केला जातो.

    925:या आकड्याचा अर्थ असा की चांदी ९२.५ टक्के शुद्ध आहेया चांदीला स्टर्लिंग चांदी असेही म्हणतातअशा चांदीला दागिने बनवण्यासाठी चांगले मानले जाते.

    900:जेव्हा कोणत्याही चांदीच्या दागिन्यांवर ९०० हा आकडा लिहिलेला असेल तेव्हा असे मानले जाईल की ही चांदी ९० टक्के शुद्ध आहेया प्रकारची चांदी काही दागिने आणि चांदीच्या नाण्यांमध्ये वापरली जाते

    835:या संख्येचा अर्थ चांदीची शुद्धता ८३.५ टक्के आहेअशा परिस्थितीतजर चांदीच्या दागिन्यांवर ८३५ क्रमांक लिहिलेला असेल तर ते किती टक्के शुद्ध आहे ते समजून घ्या.

    800:जर कोणत्याही चांदीच्या दागिन्यांवर ८०० क्रमांक लिहिलेला असेल तर ते चांदी ८० टक्के शुद्ध आहे असे मानले जाईलत्यात तांब्यासारख्या इतर प्रकारच्या वस्तूंचे मिश्रण फक्त २० टक्के आहे.

     हॉलमार्किंगचा उद्देश: भेसळ आणि मिलावट टाळणे, ग्राहकांचा विश्वास वाढवणे, बाजारात पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे

सोन्यावर  हॉलमार्किंग आधीपासूनच अनिवार्य आहे. आता चांदीसाठी देखील वैधतेचा एक पाऊल उचलले जात आहे. हा बदल नोव्हेंबर–डिसेंबरच्या दिवाळी, नवरात्रोत्सव या मोठ्या सणांच्या आधी  सुरू होण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना नियमांची जाणीव होईल. सध्यातरी ही हॉलमार्किंग वैकल्पिक आहे, पण भविष्यात ही आवश्यक नियमात परिवर्तित होऊ शकते.

  • ———————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments