३० नोव्हेंबर २०२५ ही तारीख आर्थिक दिनदर्शिकेत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अनेक करदाते, निवृत्तीवेतनधारक आणि बँक ग्राहकांसाठी विविध कागदपत्रं व अनुपालन (Compliance) प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. ही कामं वेळेवर न केल्यास दंड, व्याज, किंवा खात्यावर निर्बंध लागण्याची शक्यता असते.
खाली ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण कराव्या लागणाऱ्या ६ सर्वात महत्त्वाच्या आर्थिक प्रक्रियांचा सविस्तर आढावा:
१. TDS/TCS रिटर्न आणि चलन जमा करण्याची अंतिम तारीख

अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
ऑक्टोबर महिन्यात कपात केलेला कर (TDS) किंवा गोळा केलेला कर (TCS) यासाठी चलन-कम-स्टेटमेंट दाखल करण्याची अंतिम तारीख हीच आहे. आयकर अधिनियमाच्या कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४एम आणि १९४एस अंतर्गत कर कपात करणाऱ्यांना हे रिटर्न वेळेत जमा करणे आवश्यक आहे.
अंतर्गत समावेश: अचल मालमत्तेच्या विक्रीवरील TDS,भाड्यावरील TDS,कंत्राटदार, व्यावसायिकांना केलेल्या पेमेंटवरील TDS,उशीर झाल्यास दंड आणि व्याजाची आकारणी होते.
२. ट्रान्सफर प्राइसिंग प्रकरणांतील ITR दाखल करण्याची अंतिम तारीख
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
ज्या करदात्यांवर ट्रान्सफर प्राइसिंग ऑडिट अनिवार्य आहे, त्यांनी मूल्यांकन वर्ष २०२५–२६ (आर्थिक वर्ष २०२४–२५) साठीचा आयकर रिटर्न (ITR) याच तारखेपर्यंत दाखल करणे बंधनकारक आहे.
या रिटर्नमध्ये विविध आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे तपशील सामावलेले असल्याने त्याची उशीरात उशीर करणे महागात पडू शकते.
३. फॉर्म 3CEAA जमा करण्याची अंतिम तारीख
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
आंतरराष्ट्रीय समूहांच्या सर्व ‘कॉनस्टिटुएंट एंटिटीज’ना आर्थिक वर्ष २०२४–२५ साठी ‘मास्टर फाइल’शी संबंधित फॉर्म 3CEAA याच तारखेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.
ट्रान्सफर प्राइसिंगशी संबंधित नियमांचं पालन न केल्यास मोठ्या दंडाची तरतूद आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी हा फॉर्म वेळेत सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
४. PNB KYC अपडेटची अंतिम तारीख
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना ३० नोव्हेंबरपूर्वी आपली KYC प्रक्रिया अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्या खात्यांची KYC रिन्यूअलची तारीख ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत होती, त्यांना ही प्रक्रिया अनिवार्य आहे.
RBI च्या नियमांनुसार, KYC अपडेट न केल्यास खाते ‘फ्रीझ’ अथवा मर्यादित स्वरूपात चालवले जाऊ शकते. त्यामुळे खात्यांवरील व्यवहारांत अडचण येऊ शकते.
५. NPS मधून UPS मध्ये स्विच करण्याची अंतिम मुदत

अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
पात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS (National Pension System) मधून UPS (Unified Pension Scheme) मध्ये स्विच करण्याची अंतिम मुदतही ३० नोव्हेंबर आहे.
केंद्र सरकारने विविध स्टेकहोल्डर्सकडून मागणी आल्यानंतर ही अंतिम तारीख यापूर्वी दोनदा वाढवली होती. UPS मधील नवीन सुधारणा—जसे वाढीव निवृत्तीवेतन फायदे आणि कर लाभ—यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपला निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ मागितला होता.
या डेडलाइननंतर स्विचची सुविधा बंद होण्याची शक्यता आहे.
६. निवृत्तीवेतनधारकांसाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख
अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५
देशातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी आपले वार्षिक ‘लाईफ सर्टिफिकेट’ ३० नोव्हेंबरपूर्वी जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा पेन्शन तात्पुरती थांबू शकते.
नंतर सर्टिफिकेट जमा केल्यास पेन्शन पुन्हा सुरू होते आणि अडलेली रक्कम एकत्र दिली जाते.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (Jeevan Pramaan) ही सुविधा देखील उपलब्ध आहे.
३० नोव्हेंबर २०२५ ही तारीख अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक आणि वैयक्तिक कामांसाठी निर्णायक आहे. TDS/TCS रिटर्न, ट्रान्सफर प्राइसिंग ऑडिट, PNB KYC, UPS-NPS स्विच, तसेच निवृत्तीवेतनधारकांचे लाईफ सर्टिफिकेट अशा विविध प्रक्रियांमध्ये ही अंतिम तारीख लागू होते.
कोणत्याही दंडापासून बचाव आणि व्यवहारांमध्ये अडथळे टाळण्यासाठी ही सर्व कामं वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक आहे.






