सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे उद्या वाटप ..

0
119
Satej Patil
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या ६ लाख वह्यांचे उद्या शनिवारी ज्येष्ठ साहित्यक डॉ.राजन गवस यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवनात सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

लाईक फाॅर लाईक या टॅगलाईनखाली राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात वाचन, योगासन, निसर्ग मैत्री आणि छंद याद्वारे आपले जगणे सुंदर बनवूया अशी साद घालण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला २००७ पासून वह्यांचे संकलन केले जाते. विशेष म्हणजे ६४ लाख ३७ हजार वह्या २०२४ पर्यंत जमा झाल्या होत्या. या वह्या १४ लाख ५३ हजार ९६५ विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत.

या सामाजिक बांधिलकीची २०१४ मध्ये लिम्का बुक ऑफ रॅकॉर्डसमध्ये नोंद झाली. तर २०१६ मध्ये वर्ल्ड रेकॉर्डस इंडियानेही याची दखल घेतली.

—————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here