Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

              नको म्हणलं तरी कुठल्या घोड्यावर बसू… अशी अवस्था उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांची झाली आहे. सगळ जग इराण विरुद्ध अमेरिका या चालू असलेल्या युद्धाला वैतागली असताना. हा बाबा मात्र फक्त निमित्त शोधत आहे. या युद्धात सुळकी मारायला. 

आकाशाला दुर्बिण लाऊन बसलेल्या या हरकेश माणसाला ‘फ्रीडम शिल्ड’ हे निमित्त घावल आहे. म्हणजे काय तर सध्या दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्या संयुक्त लष्करी कवायती सुरू आहेत. या कवायतींना Freedom Shield असे नाव आहे. उत्तर कोरिया नेहमीच या कवायतींना युद्धाची तयारी असे म्हणत विरोध करत आला आहे.

विशेष म्हणजे, या संयुक्त कवायती सुरू असतानाच उत्तर कोरियाने युद्धसरावाचा भाग म्हणून क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

      माहितीनुसार, उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियन लष्कराने पूर्व किनाऱ्याजवळील समुद्राच्या दिशेने सुमारे 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. ही चाचणी लष्करी युद्धसरावाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

          जगात आधीच इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढलेला असताना आता उत्तर कोरिया नेही मोठी लष्करी हालचाल करत 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दक्षिण कोरिया आणि जपानची प्रतिक्रिया

या घटनेवर दक्षिण कोरिया आणि जपान यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की, उत्तर कोरियाने पूर्व समुद्रकिनाऱ्यावरून अज्ञात प्रक्षेपास्त्र प्रक्षेपित केले असून ते बॅलेस्टिक मिसाईल असण्याची शक्यता आहे.

जपानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही सर्व क्षेपणास्त्रे जपानच्या आर्थिक क्षेत्राबाहेर समुद्रात पडली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

जागतिक परिस्थितीत भर

मध्यपूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे आधीच जागतिक वातावरण तणावपूर्ण आहे. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नवीन घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here