spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

HomeUncategorizedनवीन भाडे करार प्रणाली वापरण्यास स्थगिती

नवीन भाडे करार प्रणाली वापरण्यास स्थगिती

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

‘नोंदणी मुद्रांक विभागा’कडून ग्राहकांना सोयीचे व्हावे, यासाठी ‘भाडेकरार २.०’ ही नवी संगणक प्रणाली विकसित केली गेली. त्याद्वारे भाडेकरार ऑनलाइन करण्याचे आदेश विभागाने जारी केले. नव्या संगणक प्रणालीत सुमारे तीसहूनअधिक त्रुटी ‘सर्व्हिस प्रोव्हायडर असोसिएशन’ने सुचविल्या होत्या. या त्रुटी दुरुस्त करा आणि नंतरच नवी प्रणाली वापरा, अशी विनंती करण्यात आली होती.


एक एप्रिलपासून ‘२.० संगणक’प्रणालीद्वारे भाडेकरार करण्यास सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात त्यात त्रुटी आढळल्याने या प्रणालीच्या वापरास ११ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती दिल्यानंतर मुदत संपत नाही तोच २१ एप्रिलपर्यंत ही संगणकप्रणाली तूर्त वापरण्यास बंद ठेवण्यात आली असल्याचे नोंदणी विभागाने संकेतस्थळावर जाहीर केले. ‘नियोजित सर्व्हर अपग्रेडेशनमुळे भाडेकराराच्या सेवा दस्तऐवज नोंदणीसाठी उपलब्ध नसतील. या सेवा ११ ते १५ एप्रिलपर्यंत बंद राहतील,’ अशी सूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर २१ एप्रिलपर्यंत संगणकप्रणाली बंद ठेवण्याची सूचना जाहीर करण्याची तयारी असतानाच एक मेपर्यंत ही प्रणाली दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘भाडेकरार २.०’ या संगणकप्रणालीत सर्व्हिस प्रोव्हायडर वर्गाने सुचविलेल्या त्रुटीत प्रामुख्याने मालक, साक्षीदार, भाडेकरूंची ओळख पटविण्यासाठी काही ‘ओटीपी’ मागविले आहेत. सुमारे दहा वेळा ‘ओटीपी’ देण्याची वेळ येत असल्यामुळे हे ‘ओटीपी’ देणे अडचणीचे ठरते आहे. एक दस्त नोंदणीसाठी दोन ते तीन तासांचा कालवधी लागतो; शिवाय अन्य त्रुटीही असल्याने पुणे शहरासह ग्रामीण भागात वापरण्यात येणारी ही प्रणाली सध्या बंद ठेवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments