spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeपर्यटनचारचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका १३ मे पासून सुरु..

चारचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका १३ मे पासून सुरु..

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

आपल्या गाडीवर ‘झकास’ नंबर हवा, मग तो चार चाकी असो की दुचाकी ! कोल्हापुरात पसंतीच्या नंबरांसाठी लोक थेट लाखो रुपये खर्च करतायत. आरटीओ ऑफिसात दर आठवड्याला नंबरसाठी रांगच लागते. बोली लावून नंबर विकत घेताना कोल्हापुरी तडजोड कुठं दिसत नाही. काहींनी तर तीन ते चार लाख खर्चून फक्त नंबरच घेतला, गाडीचं बिल नंतर दिलं म्हणे ! बोली लावली जाते ती थेट २-३ लाखांपासून. काहींची तर एवढी हौस असते की नंबरसाठी गाडी विकून टाकायची वेळ येते.

कोल्हापूरकरांची ही ‘नंबर’ प्रेमाची हौस काही थांबायचं नाव घेत नाही. आरटीओ ऑफिसात अधिकारीही सांगतात, “इथं नंबर मिळवणं म्हणजे थेट प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. आता आरटीओ कडून नवी मालिका सुरू होत आहे. आणि पुन्हा पसंतीच्या नंबरसाठी चढाओढ लागणार आहे.

खासगी चारचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GU लवकरच संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH09-GZ दि. १३ मे पासून सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. १३ व १४ मे रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३ या वेळेत खिडकी क्र. ९ येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

वाहन नोंदणी क्रमांक मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.

  • पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत गृह विभाग, महाराष्ट्र शासन राजपत्र, अधिसूचना दि. ३० ऑगस्ट २०२४ अन्वये विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मूळ रकमेचा डीमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे.
  • धनाकर्ष किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये.
  • धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही.
  • पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. १३ व १४ मे २०२५ रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३ या कालावधीत कार्यालयात सादर करावा. १४ मे २०२५ रोजी सायं. ५ वाजल्यानंतर पसंतीच्या क्रमांकाच्या व (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या) याद्या प्रसिध्द केल्या जातील. लिलावात जादा रकमेचा एकच डिडी स्वीकारण्यात येईल.
  • धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व आधार लिंक केलेला मोबाईल क्रमांक लिहीणे आवश्यक आहे.
  • एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराकडून दि. १५ मे रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात सकाळी ९.४५ ते दुपारी २.३० या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील.
  • एका पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दि. १५ मे रोजी दुपारी ४ वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. फक्त अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल.
  • लिलावास येताना अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
  • आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला संलग्न असलेलाच मोबाईल नंबर व पत्ता अर्जावर लिहावा, अर्जावर मोबाईल नंबर लिहिला नसल्यास आपला कोणताही हक्क आकर्षक क्रमांकावर राहणार नाही. तसेच यादी मध्ये आपले नाव आले तरी आपल्यास आकर्षक क्रमांक मिळणार नाही.
  • एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही, नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून १८० दिवसाच्या आत नोंदणी करुन नाही घेतली तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक अपोआप रद्द होईल व शुल्क सरकार जमा होईल.
  • विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही.
  • वैयक्तिक अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फी ची खात्री करुनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल.
  • लिलाव प्रकरणी दुसरा डी.डी. सादर करताना मूळ रकमेचा जमा डी.डी. व दुसऱ्यांदा सादर केलेल्या डी.डी.ची रक्कम एकत्रित करुन जादा रक्कम देणाऱ्यास हा क्रमांक देण्यात येईल.
  • लिलाव प्रकरणी दुसऱ्या वेळीही समान रक्कमेचा डी.डी. आल्यास किंवा दुसऱ्या वेळी डी.डी. सादर न झाल्यास ज्या व्यक्तीने पहिल्यावेळी प्रथम डी.डी. सादर केला असेल त्याला हा क्रमांक देण्यात येईल.   
  • सध्या सुरु असलेली चार चाकी वाहन मालिका GU मधील उर्वरित क्रमांक संपल्यानंतर नवी मालिका GZ फॅन्सी नंबर पोर्टलवर प्रदर्शित करण्यात येईल, असेही श्री. भोर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
    ——————————————————————————–
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments