कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
झ्युरिक-स्वित्झर्लंड येथे पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा आपल्या खेळातील सातत्य सिद्ध करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. चोप्राने आपल्या सर्वोत्तम प्रयत्नात ८५.७१ मीटर अंतरावर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावले.
ही स्पर्धा जागतिक दर्जाच्या खेळाडूंची होती, आणि नीरजने जोरदार कामगिरी करताना अंतिम फेरीनंतर रौप्य पदक मिळवले. प्रथम स्थान जर्मनीच्या जुलियन वेबरने पटकावले. त्याने ८७.३ मीटर इतकी भालाफेक केली.
नीरज चोप्रा सध्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत असून, या स्पर्धेतील कामगिरी त्याच्या आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. झ्युरिक डायमंड लीगमध्ये मिळवलेले हे रौप्य पदक त्याच्या आंतरराष्ट्रीय यशाच्या यादीत आणखी एक मानाचा तुरा ठरले आहे.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकूनही पाकिस्तानचा अर्शद नदीम डायमंड लीगच्या अंतिम फेरीत दिसला नाही. नदीमने डायमंड लीग २०२५ च्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नव्हता, त्यामुळे तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. दरम्यान, सप्टेंबरमध्ये टोकियो येथे होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज आणि नदीम यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. पॅरिसमधील स्टेड सेबॅस्टियन शार्लेट स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत नीरजनं जर्मनीच्या ज्युलियन वेबरला पछाडत सुवर्ण मिळवलं.