Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागात विद्यार्थ्यांना बी.एस्सी. – नॅनो सायन्स व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध असून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या आधुनिक शिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बुद्धीला चालना देऊन शास्त्र व तंत्रज्ञान (सायन्स अँड टेक्नॉलॉजी) यामध्ये आव्हानात्मक करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ‘नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. संशोधन, उद्योजकता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयय स्तरावरील कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी हे एक उत्तम क्षेत्र आहे.

या नाविन्यपूर्ण व प्रगतशील क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्यासाठीचे आवश्यक शिक्षण हे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर करता येऊ शकते. त्यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc.), मास्टर्स ऑफ सायन्स (M.Sc.), B.Sc.-M.Sc. इंटिग्रेटेड, आणि बॅचलर ऑफ टेक्नाॅलाॅजी (B.Tech), यासारखे अभ्यासक्रम आपल्या देशातील निवडक विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. या पुढील Ph.D. पर्यंतचे शिक्षण आणि पोस्ट डॉक्टरल फेलोशिप व संशोधनासाठी भारत व भारताबाहेर अमर्यादित संधी उपलब्ध आहेत.

यांच्याशी संबंधित अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उपलब्ध असून स्कूल ऑफ नॅनोसायन्स व नॅनोटेक्नोलॉजी या अधिविभागमध्ये बी.एस्सी. –एम.एस्सी. नॅनोसायन्स व नॅनोटेक्नोलॉजी (इंटिग्रेटेड) या प्रोग्रॅम साठी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. तरी विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, हे एक उत्तम संधी असून त्याचा इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिविभागाचे संचालक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे बी.एस्सी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उत्तीर्ण विद्यार्थी एम-एस्सी नॅनोसायन्स व नॅनोटेक्नोलॉजीसाठी प्रवेश घेऊ शकतात. आजपर्यंत या अधिविभागातून अनेक विद्याथ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून ते संशोधन, उद्योजकता तसेच शासकीय व खाजगी कंपन्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.

————————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here