दिंडीप्रमुख आनंदराव लाड महाराज यांची माहिती
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील दिंडी यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. हा उत्सव पश्चिम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील श्रद्धेची प्रतीक ठरलेला आहे. यावर्षी ५ जुलैपासून या दिंडीला सुरुवात होणार असून, पारंपरिक रिंगण सोहळ्याची तयारी व नियोजन करण्याचे आवाहन दिंडीप्रमुख आनंदराव लाडमहाराज यांनी केले आहे. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळाची नियोजन बैठक पार झाली. बैठकीत या उत्सवाचा आढावा घेण्यात आला.
यावर्षी ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी भवानी मंडप येथे नगर प्रदक्षिणा, गोल रिंगण, सासने इस्टेट टिंबर मार्केट येथे प्रवचन व विसावा आणि ६ जुलै रोजी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून सकाळी ७ वाजता दिंडीचे नंदवाळकडे प्रयाण होणार आहे.
अंतिम तयारीसाठी २७ जूनला बैठक



