EPS 95 National Struggle Committee has been holding a sit-in protest at Jantar Mantar, Delhi, since August 4, under the leadership of the committee's national president, Commander Ashok Raut.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
ईपीएस् ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती ४ ऑगस्ट पासून जंतर मंतर दिल्ली येथे, समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करीत आहे. सदर आंदोलनास देशातील विविध राज्यातील २४ खासदारांनी भेटी देऊन, संघटनेच्या न्याय मागण्या मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या प्रश्नाकडे तातडीने गांभीर्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संसदेमधील प्रश्नोत्तराच्या माध्यमाबरोबरच उद्या ६ ऑगस्ट रोजी खासदार श्रीमंत शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आंदोलन स्थळी उपस्थित २४ खासदारांनी संसद भवनाच्या पायऱ्यावर बसून धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली.
याशिवाय अनेक खासदार महोदयांनी त्यांच्या काही अपरिहार्यतेमुळे आंदोलन स्थळी भेट देऊ शकलो नाही, मात्र उद्याच्या संसद भवना मधील धरणे आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे फोनवरून आश्वासन दिले.