कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देणाऱ्या पिक विमा योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील २०२४ च्या खर्चाचा उर्वरित भाग तसेच २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी सुधारित योजनांसाठी तीन महत्त्वाचे शासन निर्णय ( जीआर ) निर्गमित करण्यात आले आहेत.
या निर्णयांतर्गत राज्य शासन व शेतकऱ्यांचा मिळून एकूण २७५ कोटींपेक्षा अधिक निधी विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळण्यास गती मिळणार असून, त्यांच्या आर्थिक सुरक्षेत मोठी भर पडणार आहे.
रब्बी हंगाम २०२४-२५ साठीही निधी मंजूर
राज्य शासनाने रब्बी हंगाम २०२४-२५ अंतर्गत पिक विमा योजनेंतर्गत २०७ कोटी ५ लाख ८० हजार ७७६ रुपये विमा कंपन्यांना वितरित करण्याची मंजुरी दिली आहे. यामध्ये ९ पिक विमा कंपन्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या योगदानाचा हिस्सा म्हणून १५ कोटी ५९ लाख ७१ हजार ९८६ रुपये देखील मंजूर करण्यात आले असून, तो लवकरच विमा कंपन्यांकडे वर्ग केला जाणार आहे.
हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारा असून, निसर्गाच्या संकटांशी सामना करताना त्यांना दिलासा मिळणार आहे.
——————————————————————————————