spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeकृषीमोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम न्यूज 

 ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय सिनेमातील २०२३ मधील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. यात अनेक दिग्गजांना विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले आहे.

प्रमुख पुरस्कार विजेते असे :

दादासाहेब फाळके पुरस्कार : ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट चित्रपट : विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘12th Fail’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: ‘Kathal – A Jackfruit Mystery’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्मचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मॅस्सी (12th Fail) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: राणी मुखर्जी यांना ‘Mrs Chatterjee vs Norway’ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर: दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांना ‘The Kerala Story’ साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर असे दोन पुरस्कार मिळाले.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: शिल्पा राव यांना ‘जवान’ चित्रपटातील ‘छलिया’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: ‘Premistunna’ या तेलुगू गाण्यासाठी पी.व्ही.एन.एस. रोहित याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला.

इतर पुरस्कार :

‘Sam Bahadur’ ला सर्वोत्कृष्ट मेकअप, सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि राष्ट्रीय, सामाजिक व पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
‘Rocky Rani Kii Prem Kahaani’ ला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
‘Animal’ ला सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइनचा पुरस्कार मिळाला.

मराठी आणि प्रादेशिक चित्रपट :

या सोहळ्यात हिंदी सिनेमांसोबतच प्रादेशिक चित्रपटांनीही आपला ठसा उमटवला. विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीने यावर्षी अनेक महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत.
मराठी चित्रपटांचा गौरव
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments