कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात कालपासून पुन्हा पावसास सुरुवात झाली. आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. काल आणि आज सकाळी पाऊस रिमझिम होता. अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आज पावसास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्र आजपासून सुरु होत आहे. अमावस्यानंतर हळूहळू पाऊस जोर धरण्याची जास्त शक्यता आहे. पुढील १५ दिवस विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकाना अत्यंत दक्ष राहिले पाहिजे, कारण एकसारखा जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु राहिल्यास महापुराचा धोका उद्भाऊ शकतो.
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी बंधारे, धरणापैकी अनेक बंधारे भरली आहेत तर धरणे आणि काही बंधारे भरण्याच्या मार्गावर आहेत. पाटबंधारे विभाग पुढील पावसाचा अंदाज घेऊन व महापुराचा धोका टाळण्यासाठी धरणे व बंधारे ६० टक्के पर्यंत खाली करण्याचे प्रयत्न करत आहे. दरवर्षी १५ जुलै ते ७ ऑगस्ट या तीन आठवड्यात होणारा जोरदार पाऊस महापुराचे संकट ओढावतो असा आजवरचा अनुभव आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, उर्वरीत भागात मुसळधार पावसाची हजेरी असेल. साधारण २७ जुलैपर्यंत असाच पाऊस राहील.
हवामान विभागाच्याअंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढच्या २४ तासांमध्ये शहरासह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तर पावसाची हजेरी असेल. दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरांसह, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
————————————————————————————–



