कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
स्मार्टफोन सध्या अत्यावश्यक बाब झाली आहे. मुलांपासून ते वृद्धांपर्यत याची सर्वाना गरज वाटते. या फोनच्या महत्त्वामुळेच चोरीला जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. अशा घटना सर्रास घडताहेत.
- Android फोनमध्ये Anti Theft Alarm फीचर ऑन करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Settings ओपन करा.
- सेटिंग्स मध्ये तुम्हाला स्क्रोल-डाउन केल्यानंतर Security and Privacy चा ऑप्शन दिसेल.
- त्यानंतर More Security वर टॅप करा.
- इथे तुम्हाला Anti-Theft Features चा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप करा.
- त्यानंतर नेक्स्ट स्क्रीनवर Anti-Theft Alarm चा ऑप्शन मिळेल.
- तुम्हाला Anti-Theft Alarm च्या समोर दिसत असलेला टॉगल ऑन करा.
Anti-Theft Alarm च्या समोरील टॉगल ऑन केल्यानंतर जेव्हा तुमचा फोन चोरी होईल त्यावेळी मोठ्या आवाजाचा एक अलार्म वाजू लागेल. हे नवीन फिचर बहुतांश स्मार्टफोनमध्ये देण्यात आलं आहे. परंतु जर तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये असं अँटी-थेप्ट अलार्म फीचर सापडत नसेल तर सेटिंग मध्ये लिहून सर्च करा. तुमच्या स्मार्टफोन ब्रँडनुसार हे फिचर वेगळ्या नावाने किंवा वेगळ्या सेटिंग अंतर्गत दिलं गेलं असावं.