spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeउर्जामनसेचे स्मार्ट मिटर सक्ती विरोधात पन्हाळा तालुका उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन..

मनसेचे स्मार्ट मिटर सक्ती विरोधात पन्हाळा तालुका उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन..

पन्हाळा : प्रतिनिधी 

स्मार्ट/प्रीपेड मिटरला संपूर्ण विरोध व सध्याचे मीटर व जोडणी आहे तशीच ठेवण्यात यावीत, आशा आशयाचे एक निवेदन पन्हाळा महाराष्ट्र नाव निर्माण सेनेच्या वतीने महावितरण विभागाचे  पन्हाळा  उप कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. सक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अशा सक्तीच्या जोडणीला प्रखर विरोध व मनसे स्टाइलने आंदोलन करू असा इशारा देखील महाराष्ट्र नाव निर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे. तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी खोटी आणि चुकीची जाहिरात केली आहे. या संबंधातील टेंडर्स मंजूर करण्यात आलेली आहेत आणि लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरु होईल असे स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोप महाराष्ट्र नाव निर्माण सेनेच्या वतीने यावेळी करण्यात आला आहे.  स्मार्ट/प्रीपेड मिटरला संपूर्ण विरोध आणि सध्याचे मीटर व जोडणी आहे तशीच ठेवण्यात यावीत, आशा आशयाचे एक निवेदन पन्हाळा महाराष्ट्र नाव निर्माण सेनेच्या वतीने महावितरण विभागाचे पन्हाळा उप कार्यकारी अभियंता रणजीत पाटील यांना देण्यात आले आहे. 

वीज कायदा 2003 मधील अधिनियम क्रमांक 47 (5) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकाला आहेत. कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या या हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे संपूर्ण उल्लंघन करीत आहे. हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे ग्राहक म्हणून आमच्या हक्कानुसार आमचा सध्याचा आहे तोच पोस्टपेड मीटर पुढेही कायम ठेवण्यात यावा. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे, पन्हाळा तालुकाध्यक्ष लाखां लादे, उपाध्यक्ष नयन गायकवाड, दत्ता सावंत, कोडोली शहराध्यक्ष तुषार चिकुर्डेकर, पन्हाळा तालुकाध्यक्ष शुभांगी पाटील, सचिव होतीत कदम आदि उपस्थित होते. 

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments