Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

 

डीजीसीए (Directorate General of Civil Aviation) ने विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडून होणाऱ्या वाढत्या गैरवर्तनाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन नियम प्रस्तावित केले आहेत. या प्रस्तावानुसार, विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशावर त्या क्षणापासून ३० दिवसांची हवाई प्रवासबंदी लागू केली जाईल.

 

सध्याच्या नियमानुसार, एखाद्या प्रवाशाने गैरवर्तन केल्यास संबंधित विमान कंपनीकडून एक अंतर्गत समिती स्थापन केली जाते. ही समिती प्रकरणाची चौकशी करते. चौकशीदरम्यान संबंधित प्रवाशावर ४५ दिवसांची अंतरिम बंदी घालण्यात येते. त्यानंतर समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम कारवाई केली जाते.

मात्र, या प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी डीजीसीएने तात्काळ ३० दिवसांची बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अंतिम नियम लागू झाल्यानंतर गैरवर्तनाच्या क्षणापासूनच बंदी प्रभावी होईल. गैरवर्तनाच्या गंभीरतेनुसार अतिरिक्त दंडात्मक कारवाईही करण्यात येऊ शकते.

नवीन मसुद्यावर चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिस्त राखण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here