spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeक्रिडामीराबाई चानूला सुवर्णपदक

मीराबाई चानूला सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत यश

न्यू दिल्ली : प्रतिनिधी 

कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप- २०२५ या स्पर्धेनंतर वर्षभराच्या विश्रांतीनंतर मीराबाई चानुने पुनरागमन करत राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलोग्रॅम वजनी गटात ८४ किलो स्नॅच आणि १०९ किलो क्लीन अँड जर्कमध्ये एकूण १९३ किलो उचलून सुवर्णपदक जिंकलं.

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या नियमात बदलानंतर मीराबाईने महिला ४८ किलो वर्गासाठी नवीन वेट क्लासमध्ये प्रशिक्षणाची रणनीती बनवली आहे. यात सुधारित आहार, संतुलित प्रशिक्षण आणि पुनर्बांधणी पद्धती (जसे की मसाज, आइस बाथ) यांचा समावेश आहे.

टोकियो ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाईने  महिलांच्या ४८ किलो वजनी गटात नवा विक्रम प्रस्थापित करत पहिल्या स्थानावर मजल मारली. मीराबाईने यापूर्वी ४९ किलो गटात खेळायची होते, परंतु हा गट आता ऑलिंपिक स्पर्धेतून वगळण्यात आल्याने तिने ४८ किलोमध्ये पुनरागमन केले. या गटात तिने एकूण १९३ किलो उचलून सुवर्णपदक जिंकले. यासोबतच एकूण, स्नॅच आणि क्लीन अँड जर्क या तिन्ही प्रकारांत विक्रम मोडले.

मीराबाई यांना पॅरिस ऑलिंपिकनंतर गतवर्षी गुद्घेदुखीचा त्रास सुरु झाला होता. त्यानंतर चानू  पहिल्यांदाच स्पर्धेत उतरली. तेव्हा ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती. दुखापतीमुळे वर्षभर विश्रांती घेतल्याने तिची तयारीही उशिराने  झाली होती. स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात (८४ किलो) ती थोडी डळमळली आणि गुडघ्यात त्रास जाणवला. पण दुसऱ्या प्रयत्नात तिने हे वजन सहज उचलले. तिसऱ्या प्रयत्नात ८९ किलो उचलण्यात ती अपयशी ठरली. क्लीन अँड जर्कमध्ये तिने १०५ किलोने सुरुवात करून १०९ किलो सहज पार केले आणि १९३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.


.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments