कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आयसीसीआय बँकेने बचत खात्यात नवीन बदल केला आहे. जर आपले खाते या बँकेत असेल तर तितका बॅलेन्सही ठेवायला पाहिजे. बँकेने बचत खात्यातील किमान बँक बॅलेन्सच्या रकमेत वाढ केली आहे. बचत खात्यात ठेवल्या जाणाऱ्या राखीव रकमेत पाच पटीने वाढ करण्यात आली आहे. शहरांपासून ते ग्रामीण भागातील ग्राहक सर्वांसाठी ही रक्कम वाढवण्यात आली आहे.
आयसीसीआय बँकेच्या बचच खात्यात आता किमान ५० हजार रुपये बॅलेन्स ठेवावा लागणार आहे. हा नियम ऑगस्ट पासून लागू केला आहे. यापूर्वी ही रक्कम १० हजार रुपये होती. जर बचत खात्यात किमान बॅलेन्स ठेवला नसेल तर दंड बँकेने दंडाचीही तरतूद केली आहे.
किती बॅलेन्स ठेवावा लागणार :
मेट्रो आणि शहर परिसरात किमान ५० हजार, निम शहरांमध्ये २५ हजार आणि ग्रामीण भागात ही रक्कम १० हजार ठेवावी लागेल. आधी मेट्रो आणि शहरी भागातील बँकांमध्ये किमान १० हजार रुपये बॅलेन्स ठेवणं अनिवार्य होतं. यामुळे आता देशांतर्गत बँकांमध्ये सर्वाधिक मिनिमम अकाऊंट बॅलेन्स आयसीसीआय बँकेचा आहे.
अन्य बँकांमध्ये किती बॅलेन्स ठेवावा लागतो :
सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयने २०२० मध्येच किमान शिल्लक मर्यादा काढून टाकली होती, म्हणजेच हा नियम रद्द करण्यात आला होता. दुसरीकडे, इतर बँकांनी ऑपरेशन खर्च व्यवस्थापित करण्यासाठी बचत खात्यातील किमान शिल्लक मर्यादा २००० रुपयांवरून १० हजार रुपये ठेवली आहे.
एचडीएफसी बँकेची मर्यादा किती :
देशातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्र बँकेबद्दल बोलायचं गेल्यास मेट्रो आणि शहरातील शाखांच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये कमीत कमी १० हजार आणि निमशहरी क्षेत्रातील बँकांमध्ये ५००० रुपये आणि गावातील शाखांमध्ये २५०० रुपये ठेवणं अनिवार्य आहे.
कमीत कमी बँलेन्स का ठेवायचा :
दैनंदिन खर्च आणि गुंतवणूक पूर्ण करण्यासाठी बँका किमान शिल्लक रकमेची आवश्यकता लादतात आणि जर ग्राहकाने किमान शिल्लक राखली नाही तर त्याला दंड आकारला जातो. बँकेने आपल्या ग्राहकांना त्यांचे खाते तपासण्यास आणि त्याचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
व्याजही कमी केलं :
एप्रिलमध्ये, आयसीसीआय बँकेने त्यांच्या बचत खात्यांवरील व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली. एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेनेही व्याजदरात कपात केल्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला. आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यावर २.७५ व्याज मिळेल.