माथेरान हे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील लोकप्रिय हिल स्टेशन आहे. अनेक परदेशी पर्यटक देखील माथेरानला आवर्जून भेट देतात. चोहीकडे हिरवळ, डोंगरांमधून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे आणि समोरचं माणूसही दिसणार नाही इतकं दाट धुकं… पावसाळ्यात माथेरानचे सौंदर्य अधिकचं खुलून दिसते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य पाहणे म्हणजे स्वर्ग सुखचं म्हणावे लागेल.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतातील सर्वात डेंजर हिल स्टेशन आपल्या महाराष्ट्रात आहे. इथं वाहनांना No Entry आहे. किती मोठा श्रीमंत असला अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी त्यांना चालतचं फिरावं लागेल. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन असलेलं माथेरान. येथे वाहने दूर पार्क करुन पायीच हे हिल स्टेशन एक्सप्लोर करावे लागते.
माथेरान हे फक्त महाराष्ट्रातीलचं नाही तर आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. यामुळेच प्रदुषण मुक्त पर्यटळ स्थळ म्हणून देखील माथेरान ओळखले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगां मध्ये २६०० फुट उंचीवर वसलेल्या माथेरान शहरात वाहनांना प्रवेश नाही. माथेरान हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे ८०३ मीटर उंचीवर आहे. मुंबईहून बदलापूर-कर्जत रस्त्याने नेरळचा घाट चढल्यावर माथेरनच्या पायथ्यापर्यंत जाता येते. वाहने फक्त इथं पर्यंतच जातात. येथून गेल्यावर माथेरान हिल स्टेशनची हद्द सुरु होते. येथे गेल्यावर वाहने पार्क करुन पुढचा प्रवास पायीच करावा लागतो. चालत, ढकलगाडी अथवा घोड्यावर बसून माथेरान मधील विविध ठिकाणांना भेटी देऊ शकतो. मात्र, अनेक पर्यटक पायी चालतच निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात.
असा आहे माथेरानचा इतिहास :
१९ व्या शतकात ठाण्याचे जिल्हाधिकारी ह्यू पॉईंटझ मॅलेट यांनी माथेरान हे पर्यटनस्थळ शोधून काढले. देशात ब्रिटीशांचे राज्य असताना उन्हाळ्यात हे ब्रिटीशांचे आवडते पर्यटन स्थळ होते. यानंतर माथेरानला ‘हिल स्टेशन’ म्हणून विकसित करण्याच्या निर्णय घेण्यात आला. १५ एप्रिल १९०७ रोजी माथेरनमध्ये टॉय ट्रेन सुरु करण्यात आली. नेरळ-माथेरानदरम्यानचा २१ किलोमीटरचा छोटासा मार्ग निसर्गरम्य घाटांतून जातो. या रेल्वे मार्गावर शेकडो वळण आहेत जी टॉय ट्रेनची सफर अधिक रोमांचक करत. टॉय ट्रेन हे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनली आहे. पावसाळ्यात रेल्वे मार्गावर घाटातून दरड कोसळण्याची भिती असते. यामुळे पावसाळ्यात टॉय ट्रेनची सेवा बंद असते.
माथेरान मधील प्रसिद्ध ठिकाणे :
माथेरानमध्ये अनेक पाईट्स आहेत. इको पॉईंट, लुइसा पॉइंट, चार्लोट झील, मंकी पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, वन ट्री हिल पॉईंट, माथेरान लॉर्ड पॉईंट, माथेरान सनसेट पॉईंट अशा अवनेक ठिकांना भेट देऊ शकता. रेल्वेने गेल्यास जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ हे आहे. नेरळ स्टेशनला उतरुन तिथून माथेरानपर्यंत जाता येते. एका दिवसात माथेरान फिरुन होत नाही. येथे मुक्कामासाठी अनेक लहान मोठे हॉटेल्स आहेत. एक ते दोन दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव घेवू शकता.



