कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
विविध उपाय योजना करून बाजार समित्या अद्यावत कराव्यात. बाजार समितीमध्ये शेतकरी केंद्रस्थानी ठेवावा. शेतकऱ्याना शेती मालाबाबत मार्गदर्शक ठरतील अशा सुविधा बाजार समित्यांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. अनेक भागातील कृषी, विपणन, नवीन संशोधन याची माहिती शेतकऱ्याना मिळण्यासाठी प्रत्येक बाजार समिती मध्ये ई वाचनालय सुरू करावे. असे प्रतिपादन कोल्हापूर पणन विभागीय कार्यालयाचे उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले यांनी सूचित केले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांच्यासाठी कोल्हापूर येथे पणन विषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तुळशीदास रावराणे सभापती सिंधुदुर्ग, सुरेश सावंत सभापती रत्नागिरी, सुरेश पाटील सभापती वडगाव पेठ, प्रकाश देसाई सभापती कोल्हापूर, रामदास पाटील सभापती गडहिंग्लज, अण्णा पानदारे सभापती जयसिंगपूर, सूर्यकांत पाटील, नामदेव परीट, उपसंचालक कृषी, तात्यासाहेब मुरूडकर सहकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालय कोल्हापूर, अच्चुत सुरवसे, डीएमआय, पणन मंडळाचे अधिकारी यतीन गुंडेकर, शेखर कोंडे, अनिल जाधव, किरण जाधव, ओंकार माने, नवनाथ मोरे व कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी, सचिव उपस्थित होते.
श्री. परीट, यांनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारी कृषी उत्पादने व त्यावरील नियमनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. केंद्र शासनाच्या डीएमआयचे अधिकारी श्री. सुरवसे यांनी डीएमआयच्या बाजार समिती व शेतकरी यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.श्री. कोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
—————————————————————————————–



