कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मराठी भाषेतील दर्जेदार व प्रभावी लेखनासाठी आवश्यक कौशल्यांचा अभ्यास करण्यासाठी ‘स्वयंसिद्धा’ आणि ‘प्रसार माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मराठी कंटेंट लेखन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर १० मे २०२५ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार असून, लेखनाची आवड असलेल्या सर्वांसाठी ही एक अनमोल संधी ठरणार आहे.
या शिबिरात हस्तलेखन ते डिजिटल लेखनाचे बदलते स्वरूप, मराठीतील प्रभावी लेखन कसे करावे?, ब्लॉग, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसाठी कंटेंट कसा लिहायचा?, जनसंवाद कौशल्ये आणि मांडणीशैली, लेखनातील शुद्धलेखन, भाषाशैली आणि प्रभावी शीर्षक, कंटेंट लेखनाच्या व्यावसायिक संधी व सोशल मीडिया लेखन या महत्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराचे नोंदणी शुल्क केवळ ₹ २०० असून, मर्यादित जागा असल्याने लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच मराठी भाषेतील लिखाणाच्या विविध पातळ्यांवर प्रशिक्षण देणे. पारंपरिक हस्तलेखनापासून ते सोशल मिडियावरील प्रभावी लेखनापर्यंतचा प्रवास समजावून सांगणे आणि लिखाणाला व्यावसायिक व करिअर स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिबिरात मार्गदर्शक म्हणून माध्यम क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. मराठी साहित्याचे जाणकार लेखक आणि अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रसारमाध्यम अभ्यासक आणि अभ्यासक्रम निर्माते डॉ. आलोक जत्राटकर, भाषाशास्त्राचे अभ्यासक डॉ. राजेंद्र पारिजात व मीडिया तज्ञ, माध्यम सल्लागार प्रताप पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
साहित्य, पत्रकारिता, ब्लॉगिंग, सोशल मिडिया अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हे शिबिर मोलाचे ठरणार आहे. मराठीतील नवोदित लेखक व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यासाठी : ०२३१-२५२५१२९ या क्रमांकावर नावनोंदणी सुरू असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
————————————————————————————-



