कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मराठी भाषेचा अभिजात वारसा जपण्याच्या आणि जागतिक स्तरावर त्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोल्हापुरातील लोकप्रिय संस्था (कांचनताई परुळेकर प्रेरित) स्वयंसिद्धा आणि प्रसारमाध्यम च्या सहयोगाने एक विशेष “मराठी कंटेंट लेखन शिबिर” आयोजित करण्यात येत आहे.
मराठीच्या अभिजाततेचा आणि वैश्विक प्रवासाचा ध्यास घेऊन हे शिबिर १० मे २०२५ रोजी दुपारी १२ ते ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे. नाममात्र शुल्क रुपये २०० असून, मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सहभागी होत आहेत :
डॉ. सुनीलकुमार लवटे — हस्तलेखनापासून संगणकीय लेखनापर्यंत शतकोत्तर वसा जपणारे संशोधक आणि जतन साक्षरतेचे शिलेदार.
डॉ. आलोक जत्राटकर — जनसंपर्क ते जनसंवाद यामध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले लेखक, संपादक, सादरकर्ते व गायक.
डॉ. राजेंद्र पारिजात — शब्दांकनकार, लेखक, प्रशिक्षक; मराठी व केंब्रिज बिझनेस इंग्रजी प्रसारक आणि ‘नाॅलेज टुरिझम’ संकल्पनेचे स्वामित्वधारक; तसेच इंटरनेट प्रचार प्रसारातील अग्रणी कार्यकर्ते.
प्रताप पाटील — प्रसार माध्यम चे संस्थापक, माध्यम तज्ञ, नवकल्पना निर्माते, सादरकर्ते व सल्लागार.
या शिबिराच्या माध्यमातून पारंपरिक लेखनापासून ते आधुनिक डिजिटल माध्यमांतील प्रभावी लेखनापर्यंतचे ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः नवोदित लेखक, पत्रकार, ब्लॉगर आणि मराठी भाषेच्या अभिजात प्रेमींना हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
आपली नाव नोंदणी खालील ठिकाणी करू शकता-
नोंदणी – स्वयंसिध्दा मुख्य कार्यालय, कोल्हापूर, संपर्क – ०२३१-२५२५१२९
———————————————————————————————



