कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना, चित्रपटात ‘सूर्या’ची भूमिका साकारणाऱ्या आस्ताद काळेने फेसबुकवर पोस्ट लिहून चित्रपटावर टीका केली आहे
विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांतच चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलचं अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. चित्रपटातले संवाद, प्रत्येक सीन आणि संगीत प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं. काही दिवसांआधी सिनेमात काम करणारा रायाजी म्हणजेच अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या काही वक्तव्यामुळे ट्रोल झाला होता. संतोषच्या ट्रोलिंगचं प्रकरण थांबत नाही तर आता छावामध्ये काम करणाऱ्या आणखी एका मराठी अभिनेत्यानं फेसबुकवर पोस्ट लिहित छावावर टीका केली आहे. त्यामुळे आता एक नवीन विवाद समोर आला आहे.
‘छावा’ चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्याची टीका
या सिनेमात ‘सूर्या’ ही भूमिका साकारणाऱ्या आस्ताद काळे याने आपल्या फेसबुक पोस्टमधून छावा चित्रपटावर थेट टीका केली आहे. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, छावा वाईट चित्रपट आहे, असं स्पष्ट वक्तव्य त्यानं केलं आहे. ज्या सिनेमात कम केलं त्याच सिनेमावर आस्तादनं बिनधास्तपणे टीका केली आहे. आस्ताद नेमकं काय म्हणाला आहे पाहूयात.आस्ताद काळेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय, “मी आता खरं बोलणार आहे. छावा वाईट चित्रपट आहे. चित्रपट म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी problematic आहे. सर्वतोपरी वाईट आहे.” या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यावर न थांबता आस्तादनं पुढे लिहिलंय, “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं? काय पुरावे आहेत याचे?” या प्रश्नाबरोबर त्याने आणखी एक प्रश्न विचारलाय, त्याने लिहिलंय, “सोयराबाई राणी सरकार परपुरुषासमोर बसून पान लावतायत आणि ते खात आहेत? हे कसं चालतं?”
टीका करत आस्तादनं पुढे लिहिलंय, “औरंगजेबाचं वय आणि आजारपण लक्षात घेतलं, तर तो इतक्या वेगाने चालू शकतो का?”
सोयराबाई राणी सरकार यांचे अंत्यसंस्कार एका randon नदीकाठी? असं नाही व्हायचं हो” आस्तादच्या या पोस्टनंतर प्रेक्षकांनी टीकेची झोड उठवली आहे. सकाळी पोस्ट केल्यानंतर काही तासात आस्तादने ही पोस्ट डिलीट किंवा आरकायू केली आहे कारण त्याच्या फेसबुक टाइमलाइनवर त्याच्या पोस्ट दिसत नाहीत. आस्तादनं चित्रपटात काम करून दोन महिने झाल्यावर अशा प्रकारची टीका करणं योग्य आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.