प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मंत्रशास्त्र हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून ध्वनी, भौतिकशास्त्र आणि मानवी चेतना यांवर आधारित एक शास्त्रीय प्रणाली आहे. मंत्रांतील स्पंदने व ध्वनीरचना मज्जासंस्था आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम करून विचारांना शांत करतात. अचूक उच्चार आणि नियमित जपामुळे मानसिक ताण, सवयी व भावनिक आघात कमी होऊन आंतरिक स्थिरता निर्माण होते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने मंत्र हे हृदय व मेंदू यांच्यात सुसंवाद साधणारे प्रभावी तंत्रज्ञान असून त्याचा खरा उद्देश आत्मशांतीचा अनुभव घेणे हा आहे.आपण अनेकदा मंत्रांबद्दल ऐकतो,कोणी म्हणतं “हा फक्त श्रद्धेचा विषय आहे” कोणी म्हणतं “जुनी परंपरा आहे” पण प्रश्न असा आहे की,मंत्र खरंच फक्त श्रद्धेमुळे काम करतात का? की त्यांच्या मागे काही ठोस, वैज्ञानिक कारण आहे?
आज आपण मंत्रांच्या मागे असलेल्या विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमात खोलवर डोकावणार आहोत.
नाद ब्रह्म : विश्व म्हणजे कंपन
शास्त्रांनुसार हे विश्व पदार्थांपासून बनलेलं नाही,तर स्पंदनांपासून बनलेलं आहे.
यालाच “नाद ब्रह्म” असं म्हटलं जातं Reality is vibration.
आधुनिक क्वांटम फिजिक्सही आज हेच सांगते की प्रत्येक कण हा मुळात एक ऑसिलेशन आहे. ऊर्जा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये व्यक्त होत असते.म्हणूनच मंत्र काम करतात,मंत्रांमध्ये शब्दांचा अर्थ नाही, तर ध्वनीची रचना, उच्चाराची जागा आणि श्वासाचा दाब महत्त्वाचा असतो. प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण हा मुळात एक ऑसिलेशन म्हणजे कंपन आहे हि सगळी उर्जाच आहे जी वेगवेगळ्या स्तरावर आपल्या आपल्या कंपनाने कंपित होत असते ध्वनी म्हणजेच (sound) हे अव्यक्त आणि व्यक्त यांच्यातील पाहिलं मध्यम आहे.पदार्थ आणि प्रकाश यांच्या हि आधी कंपन अस्तित्वात होत. म्हणूनच मंत्र त्या operating system (संचालन प्रणाली) वर काम करतात मंत्र हे साधे शब्द नाहीत.
मंत्र म्हणजे एक प्रकारचे Acoustic Engineering.
मंत्र हे साधे शब्द नाहीत. उदाहरणार्थ, “ राम ” हे फक्त देवतेचं नाव नाही.
-
“रा” हा ध्वनी जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा जिभेचा शेंडा टाळूला स्पर्श करतो. हा अग्नी आणि शक्तीला जागृत करणारा ध्वनी आहे तो थेट नाभी आणि सोलार चक्रावर (solar Solar Plexus) मणिपूर चक्र सुद्धा म्हणतात काम करतो.
-
“मा” — हा ध्वनी ओठ बंद करून येतो. तो स्थैर्य (स्थिरता) आणि पोषण देतो आपल्याला जमिनीशी जोडतो.
राम हा शब्द केवळ नाम नाही तर तो उर्जा आणि स्थिरतेचा एक संतुलित फॉर्मुला आहे.ही नुसतीच प्रार्थना नाही तर ध्वनी चे अचूक डिझाईन आहे.
शब्दाच्या अर्थापेक्ष्या ध्वनीची रचना आणि तिची फ्रिकवेन्सी जास्त महत्वाची आहे. प्रत्येक अक्षराची निवड त्याच्या उच्चाराच्या जागेनुसार म्हणजे तोंडाची रचना जिभेच स्थान आणि श्वासाच्या दाबानुसार केलेलं असत. हे एक प्रकारचं ध्वनी अभियांत्रिकी (Acoustic Engineering) आहे.
ऋग्वेदात वाणीचे चार स्तर सांगितले आहेत. आपण बोलतो किंवा ऐकतो तो चौथा स्तर आहे वैखरी याच्या आधीं येतो तो मध्यमा मनातला आवाज विचारांच्या रूपातला याच्या आधी येतो, पश्यंती इथे ध्वनीला एक रूप मिळते किंवा visual विचार मिळतो.या सगळ्याच्या मुळाशी येतो, तो परा जिथे फक्त शुद्ध अविभाजीत स्पंदन मिळतात.इथे शब्द नाहीत विचार नाहीत फक्त अस्तित्वाचा मुळ नाद आहे. ऋषीमुनींनी कुठले तरी शब्द तयार केले नव्हते तर ते विश्वात आधीपासून अस्तित्वात असलेल्या ध्वनी लहरींना ट्यूनिंग करत होते. म्हणजे त्यांनी ते मंत्र ऐकले,तयार केले नाहीत ते अस्तित्वाच्या सोनिक ब्लू प्रिंट्स म्हणजे ध्वनी आराखड्यांना ऐकत होते आणि ते त्यांनी वैखरी च्या स्तरावर आणले वाटतं की ही फक्त एक सिम्बॉलिक कल्पना आहे. तर तसे नसून हे एक सायमॅटिक्सनावाचा आधुनिक विज्ञान आहे.
मंत्र, यंत्र आणि सायमॅटिक्स
आधुनिक विज्ञानात Cymatics दाखवतं की ध्वनीलहरींमुळे पदार्थ विशिष्ट भूमितीय आकारात रचले जातात.जसे की मेटल प्लेट वर वाळू टाकून त्याच्यावर विशिष्ट फ्रिकवेन्सी चा आवाज सोडल्यास ते कण विशिष्ट भूमितीय आकार धारण करतात किंवा सुंदर मंडाला (एक प्रकारची रांगोळी) तयार करतात.
प्रत्येक मंत्राचा एक यंत्र असतो यंत्र म्हणजे मंत्राच भूमितीतील रूप visual shadow जसे आपण आवाज रेकॉर्ड करून त्याचा visual wave form पहिला तर एक आकार दिसतो.
तसेच यंत्र म्हणजे मंत्राचा तोच गोठलेला दिसणारा आकार मंत्र हे वेळेनुसार असलेले कंपन आहे तर यंत्र हे अवकाशात गोठलेला कंपन आहे. म्हणजे जेव्हा आपण मंत्रोच्चार करतो तेव्हा आपण आपली सूक्ष्म शरीरात एक विशिष्ट ऊर्जा भूमिती (सुंदर मंडाला)तयार करत असतो आपल शरीर स्वतःच च एक जिवंत यंत्र आहे. (Resonant instrument)

ध्वनी तून आकार तयार होणं, मंत्रांचे अदृश्य स्तर हे सगळं अदभूत वाटते, आणि हे सगळं नुसते जुन्या ग्रंथातील तत्वज्ञान नाही तर याला आजच्या विज्ञान युगातील ECG आणि MRI या आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने डॉक्टर आणि शास्त्रज्ञ याचे परिणाम मोजू शकतात किंवा पाहू शकतात जसे कि. ECG आणि MRI स्कॅन मध्ये स्पष्टपणे दिसून आले कि मंत्रोच्चारामुळे मेंदूतील बीटा लहरी (तणाव आणि अतिविचारांशी संबंधित) कमी होतात
आणि अल्फा लहरी (शांतता आणि जागरूकतेशी संबंधित) वाढतात.म्हणजे मेंदू ची धावपळ कमी होऊन तो शांत आणि स्थिर होतो या प्रक्रियेला शास्त्रीय नाव सुद्धा आहे, याला न्यूरल एन्ट्रेनमेन्ट म्हणतात.
यात मेंदू त्या लयबद्ध आवाजाशी स्वतःला जुळवून घेतो ज्याप्रमाणे आपण संगीताच्या तालावर पाय थिरकवतो त्याचप्रमाणे म्हणजे मंत्र मेंदूच्या लहरींना शांत करतात. अनेकदा जप केल्यावर शरीराला पण खूप शांत व हलके
वाटते याचे कारण म्हणजे आपली नर्व्हस सिस्टीम वेगस नर्व्ह महत्वाची भूमिका बजावते.
हि आपल्या शरीरातील लांब मज्जातंतू आहे. जी मेंदूला हृदयाशी फुफ्फुसांशी आणि पोटाशी जोडते ‘म’ किंवा ‘न’ सारख्या अनुनासिक ध्वनींमुळे शरीरातील ‘वेगस नर्व्ह’ उत्तेजित होते. यामुळे हृदयगती कमी होते आणि शरीर ‘रेस्ट अँड डायजेस्ट’ मोडमध्ये येते.
डिफॉल्ट मोड नेटवर्क (DMN) आपल्या मनात जो सतत स्वतःबद्दल किंवा भविष्याबद्दल विचार (Self-talk) चालू असतो, त्याला मंत्रांचा जप शांत करतो.
DMN हे नेटवर्क आपण काही काम करत नसताना सक्रिय होते आणि सतत स्वतःबद्दल भूतकाळाबद्दल आणि भविष्याबद्दल विचार करते मंत्रांची लयबद्द पुनरावृत्ती या DMN ची क्रियाशीलता कमी करते त्यामुळे मनातील अनावश्यक गोंधळ सेल्फ टॉक टेप अपोआप शांत करते. कधी कधी जप करायला बसल्यावर अचानक आठवतं की अरे उद्याच्या मीटिंगची तयारी करायची आहे मग सगळं लक्ष तिकडेच जातं म्हणजे हाच तो DMN बरोबर मध्येच जो व्यत्यय आणतो आणि मंत्रांचा सराव म्हणजे त्या DMN ला हळूहळू शांत करायला शिकवतो.
आता पाहू ट्रॉमा हीलिंग बद्दल आधुनिक थेरपी सांगते की ट्रॉमा केवळ आठवणींमध्ये नाही तर तो आपल्या नर्वस सिस्टम मध्ये आपल्या शरीरात साठलेला असतो. मंत्र इथे कसे काम करतात ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मंत्र भाषेला विचारांना आणि आठवणींना बायपास करतात व थेट नर्व्हस सिस्टीम वर काम करतात ट्रॉमा हा एक विस्कळीत वेव्ह फोर्म आहे जो आपल्या सिस्टीम मध्ये अडकलेला असतो तर मंत्र एक स्थिर सुव्यवस्थेत कॅरियर वेव्ह आहे मंत्रांची पुनरावृत्ती त्या विस्कळीत पॅटर्नला रिराईट करते व त्याला पुन्हा तालात आणते म्हणूनच अनेकदा जप करताना लोकांना काहीही आठवत नसतानाही अचानक रडू येतं किंवा खूप हलकं वाटतं असं होतं कधी कधी कारण शरीर वर्षानुवर्षे साठवून ठेवलेला तणाव बाहेर टाकत असतं याला सोम्याटिक रेगुलेशन म्हणतात.
मंत्राचा किंवा जपाची पुनरावृत्ती इतकी का महत्त्वाची आहे यामागे Phase Locking हे भौतिकशास्त्रीय तत्त्व आहे.
जसं अनेक पेंड्युलम जे वेगवेगळ्या दिशेने हलत असतील तर त्यांना एकमेकांच्या स्पर्शात आणले तर शेवटी ते सर्व एकाच लयीत हळू लागतात तसंच मंत्राच्या पुनरावृत्तीने आपले पेंड्युलम म्हणजे
-
मन
-
श्वास
-
हृदय
हे सर्व एकाच तालात येतात.
मंत्रांचा चुकीचा उच्चार काय परिणाम करतो मंत्राचे तीन कार्यात्मक सत्र आहेत
१) लयबद्ध स्तर म्हणजेच रिदमिक लेव्हल यात फक्त श्वास आणि पुनरावृत्ती महत्वाची आहे जसे की राम राम राम असे जरी लयबद्ध म्हणले तरी त्याचा फायदा होतोच कारण ते तुमच्या DMN म्हणजेच डिफॉल्ट मोड नेटवर्क ला शांत करते.
२) ध्वन्यात्मक स्तर (Phonetic Level) जिथे अचूक अक्षर उच्चार महत्वाचे ठरतात.
३) बीज स्तर जिथे ध्वनी ची अचूकता साधली जाते तिचा परिणाम खूप तीव्र आणि विशिष्ट असतो.
म्हणजेच चुकीच्या उच्चारणाने नुकसान काही होत नाही पण फायदा कमी होतो.
मंत्राची साधना झाल्यावर आणि जप संपल्यावर शांततेत थोडा वेळ बसने हे खूपच महत्वाचे आहे. आपण मेहनत करून जी उर्जा निर्माण केलेली असते ती लगेच बाहेरच्या गोंधळात घालवून टाकतो हे असे आहे की तुम्ही स्वादिष्ट जेवण बनवल आणि न खातच फेकून दिले, म्हणून साधना झाल्यावर थोडा वेळ शांत बसने खूपच महत्वाचे आहे.
मंत्र हा हातोड्या सारखा आहे.त्या नंतरची शांतता हि त्या हातोड्यामुळे पडलेल्या भेगेसारखी आहे जिथून प्रकाश आत येतो.
तुम्ही मंत्र साधना व जप करून लगेचच दुसऱ्या कामात गुंतला तर ती उर्जा शरीरात मुरत नाही तिचे इन्टीग्रेशन होत नाही आणि या शांतातेतच खरे परिवर्तन घडत.
मंत्र आणि अफर्मेशन मध्ये काय फरक आहे. म्हणजे “मी शांत आहे”! असे म्हणण्यात. आणि शांततेसाठी एखादा मंत्र म्हणण्यात, अफर्मेशन्स हे विचारांच्या पातळीवर काम करतात आणि त्यासाठी विश्वासाची गरज असते.
म्हणजे मनात खोलवर अशांतता असताना वरवर “मी शांत आहे”! म्हणत असेन तर सब कॉन्शियश माईंड (अबोध मन) याला विरोध करते.एक आतील आवाज म्हणतो. “नाही! तू शांत नाही आहेस” आणि तुम्ही तुमच्या मेंदूला पटवून देण्याचा प्रयत्न करत असता मी शांत आहे. कशावर विश्वास ठेवायचा हे गोंधळात टाकणारे आहे हे तेवढ परिणामकारक होईल असे वाटत नाही. या उलट मंत्र विश्वासाला बायपास करून थेट फ्रीकवेन्सी (Frequency) च्या पातळीवर काम करतात. ते तुम्हाला शांत आहात हे पटवून देत नाहीत तर ते तुमच्या सिस्टीम मध्ये शांततेची फ्रीकवेन्सी (Frequency) निर्माण करतात. नर्वस सिस्टीमला शांत करतात. ज्यामुळे शांतता हि तुमची नैसर्गिक व मूळ स्थिती बनते.
“It doesn’t ask for your belief, it changes your state of being.”
मंत्रांमुळे तुम्ही पारदर्शक बनता तुमच्या विचारात स्पष्टता येते जेव्हा तुमच्या आतली स्पंदन स्थिर होतात तेव्हा अहंकार आणि भीतीची पकड आपोआप ढिल्ली होतात तुमची ओळख तुमच्या विचारांशी आणि भावनांशी राहत नाही शेवटी मंत्र व जप ही सुटून जातो.
मागे उरते ते फक्त शुद्ध जाणीव, सहज उपस्थिती, तुमच्या मध्ये अशी शांतता निर्माण करते की जी कोणत्याही बाह्य स्थिती वर अवलंबून नसते.
मंत्र चांगले परिणामकारक ठरतात कारण ते आपल शरीर, मान, चेतना व हे संपूर्ण ब्रह्मांड हे एका लयी व स्पंदनावर आधारित असतात हे धर्म नाही आपल्या आतील भौतिक शास्त्र आहे.(Inner Physics) आहे.






