बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे यांचा पाठींबा..

0
230
Manoj Jarange supports Kadu's food boycott movement.
Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क

माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडू हे आंदोलना करत आहेत. या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिलेला आहे. यानंतर बोलताना जरांगे यांनी म्हटले की, ‘बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभरामध्ये १५ जूनला चक्काजाम आंदोलन करण्याचा ठरलं आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला शांततेत पाठिंबा द्यावा, असं आवाहन देखील त्यांनी  केले आहे.

पुढे बोलताना जरांगे यांनी म्हटले की, ‘पैठण फाटा, शहागड येथे आमचं चक्काजाम आंदोलन ठरलं आहे. या आंदोलनात जात-पात धर्म सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

या आधी ११ जून रोजी मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली होती. त्यावेळी जरांगे यांनी बच्चू कडू यांना तब्ब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी जरांगे यांनी म्हटले होते की, ‘शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू हे गोरगरीबांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. एखाद्या विषयाला न्याय मिळवायचा असला तर रस्त्यावर उतरावं लागतं. बच्चू कडू यांच्या मागण्यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जात-पात न पाहता रस्त्यावर उतरायला हवं.’

 

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here