कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शंभूराजे मर्दानी खेळ विकास यांच्यावतीने प्रत्येक वर्षी मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येते. यावर्षी सुद्धा २० मे ते ३० मे या कालावधी मध्ये या शिबिराजे राजारामपुरी येथील ९ नंबर शाळेमध्ये आयोजन करण्यात येणार आहे.
युद्धकला विशारद वस्ताद कै. सुरज ढोली यांनी सुरु केलेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये लाठी काठी, तलवार, दांडपटा, या आणि इतर शस्त्रांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचबरोबर मेडिटेशन, प्राणायाम, आठवणीतले खेळ, साहसी खेळ नेमबाजी यांचे ही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कोल्हापूरात प्रथमच महिलांसाठी या शिबिरात मर्दानी खेळ प्रशिक्षण देण्यात येणार आहे याचबरोबर महिला स्वंयसेवक मागदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे. १० दिवसांच्या या शिबिरात सहभागी होणाऱ्या मुलानां शिवकालीन युद्ध कलेच्या प्रशिक्षणाबरोबरच जिद्द आणि चिकाटी कशी निर्माण झाली पाहिजे, याबाबत मार्गदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे.
या शिबिरात जास्ती जास्त मुलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या अध्यक्षा श्रीमती शीतल ढोली यांनी केली आहे.





