कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शवविच्छेदन म्हंटले तरी अंगावर शहारे येतात. हे काम कष्टाचे, धोक्याचे, धीराचे आणि धाडसाचे आहे. आजवर पुरुष शवविच्छेदन करतात असे आपण ऐकले आहे. मात्र या क्षेत्रात महिलाही कार्यरत आहेत हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. महिला जास्त संवेधनशील असतात. हळव्या असतात. समोर मृतदेह आणि त्याचे विच्छेदन करायचे हे ऐकून आपले काळीज चर्र होते. वैद्यकीय दृष्टिकोनातून हे काम खूप महत्वाचे आणि तितकेच कठीण असते. शवविच्छेदनचे काम समस्तीपूर –बिहार येथील मंजू देवी करतात.
महिलांना कोमल हृदयाचे मानले जाते. काही महिला याला अपवाद ठरतात. आजकाल महिला, पुरुष जे काम करतात किंवा करू शकतात ते सर्व करतात. यात पोस्टमॉर्टेम सारख्या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या कामाचाही समावेश होतो. थरकाप अशा करिता की २४ तास मृतदेहांशी संबंध येतो. बिहारची मंजू देवी या अपवादाचे एक उदाहरण आहेत.
२० हजारांहून अधिक शवविच्छेदन
बहुतेक पुरुष आणि महिलांना पोस्टमॉर्टेम या नावाची भीती वाटते पण मंजू देवींना त्याची भीती वाटत नाही. त्यांनी एकट्यानेच हजारो मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम केले आहे. २४ वर्षांत मंजू देवीने २० हजारांहून अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. मंजू देवींना आता आकडेही आठवत नाहीत. वयाच्या २६ व्या वर्षी विधवा झाल्यानंतर, त्यांनी पाच मुलांना वाढवण्यासाठी हे कठीण काम निवडले. जे नंतर त्यांच्या उपजीविकेचे साधन बनले.
मंजू देवी समस्तीपूर येथे राहतात. त्यांची कहाणी एका सामान्य स्त्रीसारखी सुरू झाली. त्यांचे जग लग्न, मुले आणि नवरा यांच्यापुरते मर्यादित होते. मंजूनी सांगितले की लग्न लहानपणीच झाले होते. वयाच्या २६ व्या वर्षापर्यंत पाच मुले झाली. मग अचानक पतीचे निधन झाले. मुलांच्या संगोपनाचा संपूर्ण भार र पडला. एकट्या महिलेला काम मिळणे खूप कठीण होते. त्यातच मंजू देवींनी असे काही करण्याचा निर्णय घेतला जे करण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. ते काम म्हणजे पोस्टमॉर्टेम असिस्टंट बनण्याचे.
मंजू देवी यांचे पहिले पोस्टमॉर्टेम
आपल्या मुलांना वाढवण्यासाठी, मंजू देवी यांनी पोस्टमॉर्टेम असिस्टंटची नोकरी स्वीकारली. तथापि, वैद्यकीय दृष्टिकोनातून हे काम खूप महत्वाचे आहे. पण, कोणत्याही महिलेसाठी ते निश्चितच कठीण आहे. क्वचितच कोणतीही महिला ही नोकरी निवडते. पण मंजूसमोर एकच पर्याय होता – जीवन आणि परिस्थिती. मंजूने जेव्हा हे काम सुरू केले तेव्हा ती २६ वर्षांची होती. आता २४ वर्षांनंतर, त्यांच्या मते, त्यांनी २० हजारांहून अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे.
आता व्यावसायिक शवविच्छेदन परीक्षक
‘मंजू देवी म्हणतात की पहिले पोस्टमॉर्टेम त्यांच्यासाठी सोपे नव्हते. पण मी डॉक्टरांच्या सूचनेनुसार हे काम पूर्ण केले. पहिल्यांदा हे काम करुन घरी आल्यानंतर काही खाल्ले नाही आणि नीट झोपूही शकले नाही.’ आता, २४ वर्षांनंतर, मंजू देवी एक व्यावसायिक पोस्टमॉर्टम परीक्षक बनल्या आहेत.
मंजू देवींची कहाणी आपल्याला शिकवते की कठीण काळातही आपण हिंमत सोडू नये. त्यांनी आपल्या मुलांसाठी एक कठीण काम निवडले आणि त्यात यश मिळवले. त्यांची कहानी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून लक्षात येते कि एक स्त्री किती मजबूत असू शकते. त्यांनी समाजाची भीती मोडून काढली आणि एक आदर्श निर्माण केला. त्यांची कहाणी अडचणींना तोंड देणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. मंजू देवी यांनी हे सिद्ध केले की जर मनात समर्पण असेल तर कोणतेही काम कठीण नसते.
————————————————————————————



