बारामती : विशेष प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने एकहाती विजय मिळवत सत्ता जवळपास निश्चित केली आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १३ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये १२ जागांवर निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर, फक्त सांगवी गटातून भाजप नेते चंद्रराव तावरे विजयी झाले आहेत.
यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचा धुव्वा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवारांची पकड मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजयी उमेदवारांची यादी ( सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या निकालानुसार )
‘ब’ वर्ग :
-
अजित पवार – संस्था प्रवर्ग
-
विलास देवकाते – भटक्या विमुक्त राखीव
-
रतनकुमार भोसले – अनुसूचित जाती राखीव
-
नितीनकुमार शेंडे – इतर मागासवर्ग राखीव
-
सौ. संगीता कोक – महिला राखीव
-
सौ. ज्योती मुलमुले – महिला राखीव
माळेगाव गट – १ :
-
शिवराज जाधवराव
-
राजेंद्र बुरुंगले
-
बाळासाहेब तावरे
पणदारे गट – २ :
-
योगेश जगताप
-
तानाजी कोकरे
-
स्वप्नील जगताप
सांगवी गट – १ :
-
चंद्रराव तावरे (सहकार बचाव शेतकरी पॅनल)
राजकीय समीकरणांवर नजर
माळेगाव कारखान्यावर वर्चस्व राखण्यासाठी यंदा चुरशीची लढत रंगली होती. एकीकडे अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल, दुसरीकडे शरद पवार यांचे समर्थन असणारे बळीराजा पॅनल, तसेच चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि इतर अपक्ष गट अशी सरळ चौरंगी टक्कर झाली होती. मात्र, निकालाने स्पष्ट केलं आहे की, अजित पवारांची माळेगावमध्ये अजूनही घट्ट पकड आहे.
सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या निकालात निळकंठेश्वर पॅनलने जोरदार आघाडी घेतली असून, उर्वरित जागांचे निकाल काही वेळात येणार आहेत.