कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
बहुसंख्य शाकाहरी लोकांचा देश भारत आहे. वर्ल्ड आटलासच्या मते, भारतातील शाकाहरी लोकांची संख्या ही जगात सर्वाधिक आहे. भारतातील ३८ टक्के लोक शाकाहारी आहेत. देशात मासाहारी लोकांची संख्या देखील सर्वात कमी आहे. भारतात १८ टक्के लोक निवडक मास खाणारे आहेत, तर नऊ टक्के शाकाहरी आणि आठ टक्के लोक पेस्केटेरियन आहेत, म्हणजेच ते मास आणि इतर सी फूड खातात. भारतात पुढील राज्यात जास्त शाकाहारी लोक आहेत.
राज्यस्थान ७४.९ टक्के, हरियाणा – ६९.२५ टक्के, पंजाब – ६६.७५ टक्के, गुजरात – ६०.९५ टक्के. भारतात शाकाहारी रेस्टॉरंटची संख्याही अधिक आहे.
अन्य शाकाहारी देश असे : मेक्सिको – १९ टक्के, ब्राझील – ८ टक्के, तैवान – १३ टक्के, इस्त्रायल – १३ टक्के
शाकाहारी जेवणाचे महत्त्व :
आरोग्यदायी फायदे :
हृदयासाठी लाभदायक
शाकाहारी आहारात सैच्युरेटेड फॅट्स कमी असतात आणि फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
मधुमेहावर नियंत्रण
वनस्पती-आधारित आहार ग्लायसेमिक इंडेक्स कमी ठेवतो, ज्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.
कर्करोगाचा धोका कमी
भाज्या, फळे, कडधान्यांमधील अँटीऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अडथळा करतात.
पचनक्रियेवर चांगला परिणाम
फायबरयुक्त आहारामुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या कमी होतात.
पर्यावरण रक्षण :
पाण्याचा वापर कमी होतो
मांस उत्पादनासाठी खूप पाणी लागते, तर शाकाहारी उत्पादनासाठी तुलनेत खूपच कमी लागते.
जैवविविधतेचे संरक्षण
प्राण्यांचे शिकार किंवा पालन कमी केल्यास जैवविविधता टिकून राहते.
हरितगृह वायूंचा (Greenhouse Gases) कमी उत्सर्जन
शाकाहारी आहारामुळे मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड यांचे प्रमाण कमी होते.
शाकाहारी आहार केवळ आरोग्यदायीच नव्हे, तर पर्यावरणपूरक, नैतिकदृष्ट्या योग्य आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. त्यामुळे सध्याच्या जीवनशैलीत शाकाहार स्वीकारणे ही काळाची गरज आहे.