मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्रात देशाच्या साठ टक्के डेटा सेंटर क्षमता उभारली गेली असून डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ही पायाभूत सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स आणि इतर क्षेत्रांमध्ये तब्बल वीस हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सिंगापूरस्थित तमासॅक कंपनीने मणिपाल ग्रुप विकत घेतल्यानंतर नागपूरमध्ये सुमारे ७०० कोटी रुपयांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यासाठी करार केला आहे. याशिवाय मेपल ट्री कंपनीसोबत ३,००० कोटी रुपयांच्या लॉजिस्टिक पार्क प्रकल्पासाठीही करार झाला आहे.