आम आदमी पार्टीमध्ये मोठा फेरबदल; राघव चढ्ढा यांना डेप्युटी लीडर पदावरून हटवले !

0
18

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

आम आदमी पार्टी ने राज्यसभेत महत्त्वाचा बदल करत राघव चढ्ढा यांना डेप्युटी लीडर पदावरून हटवलं आहे. त्यांच्या जागी आता अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने याबाबत राज्यसभा सचिवालयाला अधिकृत पत्र पाठवलं आहे. राज्यसभेत  सर्व सामान्य जनतेचे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, त्या पैकी एक प्रश्न म्हणजे  आपल्या देशातील एयरपोर्ट मध्ये अवाढव्य लावून खाद्य पदार्थ विक्री केले जात होते त्यामुळे सर्वसामान्य प्रवाश्यांचे हाल होत होते. हा मुद्दा त्यांनी राज्यसभेत उचलून धरला होता.याचमुळे सध्या  ‘उड़ान यात्री कैफे’ हि योजना चालू झाली असून सामन्य प्रवाशांची खायची प्यायची सोय स्वस्तात झाली आहे. तसेच त्यांनी देशातील मोबाईल कंपन्या ह्या मोबाईल रिचार्जसाठी २८ दिवसांचा महिना का मोजतात, या बद्दल ही त्यांनी प्रश्न मांडला.

राघव चढ्ढा अश्याप्रकारचे प्रश्न मांडत होते की आज पर्यंत कोणत्याच राज्यसभा खासदारांनी क्वचितच मांडले असतील त्यामुळे राघव चढ्ढा लोकप्रिय होत चालले होते. अश्याप्रकारे ते चांगल काम करत असताना.अचानक केलेला हा बदल सर्वांसाठी धक्कादायक मानला जात असून यात कोणती राजनीतिक खेळी आहे का ? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षात झालेला हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. अलीकडच्या काळात राघव चढ्ढा यांनी पक्षातील महत्त्वाच्या घडामोडींवर मौन बाळगल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं.

नवीन डेप्युटी लीडर अशोक कुमार मित्तल हे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व असून त्यांनी संसदेत कृषी व शिक्षण विषयांवर सक्रिय भूमिका बजावली आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here