परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
191
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

  1. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील थेट परकीय गुंतवणुकीचे आकडे जाहीर झाले असून, महाराष्ट्राने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. देशातील ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये ३२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमातून परकीय गुंतवणुकीबाबतची माहिती दिली. ‘ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४ लाख २१ हजार ९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च, २०२५ या कालावधीत एकूण २५ हजार ४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील १० वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे.


दहा वर्षांतील महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक (रुपयांत) सन

२०१५-१६ : ६१,४८२ कोटी रु.
२०१६-१७ : १,३१,९८० कोटी रु.
२०१७-१८ : ८६,२४४ कोटी रु.
२०१८-१९ : ५७,१३९ कोटी रु.
२०१९ (एप्रिल ते ऑक्टोबर) : २५,३१६ कोटी रु.
२०२०-२१ : १,१९,७३४ कोटी
२०२१-२२ : १,१४,९६४ कोटी
२०२२-२३ : १,१८,४२२ कोटी
२०२३-२४ : १,२५,१०१ कोटी
२०२४-२५ : १,६४,८७५ कोटी

महाराष्ट्राच्या तुलनेत…

कर्नाटक: ५६,०३० कोटी
दिल्ली: ५१,५४० कोटी
गुजरात : ४७,९४७ कोटी
तमिळनाडूः ३१,१०३ कोटी
हरियाणा : २६,६०० कोटी
तेलंगण : २५,३५१ कोटी

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here