कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतामध्ये सौर ऊर्जेचा विकास वेगाने होत आहे आणि त्यामुळे अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. देशात महाराष्ट्र सौर उर्जा निर्मितीत आघाडीवर आहे. राज्य सरकारने ८,४५० मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त सर्वात जास्त सौर वीज निर्मिती धुळे जिल्ह्यातील साक्री या गावी केली जाते. या पाठोपाठ सोलापूर, जालना, बीड,सातारा हे जिल्हेही सौर ऊर्जा निर्मितीत आघाडीवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ८८ सौर ऊर्जा प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून १२१ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होते.
पीएम-सूर्यघर योजनेचा लाभ :
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १२,५१९ ग्राहकांनी पीएम-सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत, ४५.२७ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसवून वीज निर्मिती केली जात आहे.
सौर पॅनेल तंत्रज्ञानामध्ये नवनवीन बदल होत आहेत, जसे की पेरोव्स्काईट-सिलिकॉन टंडम सोलर सेल या तंत्रज्ञाणामुळे सौर वीज निर्मिती करणे सुलभ झाले आहे. सौर उर्जा प्रकल्पास महाराष्ट्रात अनुकूल परिस्थिती असल्याने सरकारने सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलं आहे. राज्याने सौर ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली असून ८,४५० मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक सौर ऊर्जा प्रकल्प आहेत, ज्यात १२१ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत ८८ सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत, ज्यामध्ये कोल्हापूरमध्ये ५४ प्रकल्प असून याची १७० मेगावॅट क्षमता आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असून १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.
————————————————————————————–
Be the first to write a review