कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी झाली. या परीक्षेचा निकाल रखडला आहे. त्यामुळे परीक्षार्थी चिंतेत आहेत. एकूण ४७९ पदांसाठी ही भरती आहे. परीक्षार्थींना पुढील तयारीसाठी निकालाची प्रतीक्षा आहे. या परीक्षेद्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी भरती होणार आहे.
निकाल कधी लागणार?
याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी स्पष्ट केले कि, निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत पूर्व परीक्षेचा निकाल लावला जाईल. १७ आणि १८ मे रोजी सुटी असल्याने १९ किंवा २० मे रोजी पूर्व परीक्षेचा निकाल लावला जाईल. सर्व परीक्षा वेळेत होणार आहेत. पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मुख्य परीक्षेची पुढील प्रक्रिया सुरू होईल.”



