कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र शासन पुरस्कृत, उद्योग संचालनालय अंतर्गत कार्यरत, स्वायत्त प्रशिक्षण संस्था असलेल्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) कोल्हापूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरावर कार्यक्रम आयोजक यांची नेमणूक करण्यासाठी स:शुल्क कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. २८ एप्रिल ते ०२ मे २०२५ या कालावधीमध्ये कोल्हापूर करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम. सी. ई. डी.) या संस्थेची ओळख व कार्य, एम.सी.ई.डी.मार्फत राबविण्यात येणाऱ्या पुरस्कृत व अपुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती, कार्यक्रम आयोजकाची भूमिका कर्तव्य व जबाबदारी, प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे बाबतचे तंत्र व पद्धती, प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे कसा आयोजित करावा,कार्यक्रमाचे प्रसिद्धीकरिता प्रचार-प्रसारासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध माध्यमांची माहिती ई.सोबत उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध शासकीय संस्था कार्यालय व योजनांची माहिती, देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना एम.सी.ई.डी. चे प्रमाणपत्र दिले जाईल तसेच एम.सी.ई.डी. मध्ये करार तत्त्वावर कार्यक्रम आयोजक म्हणून काम करण्याची संधी सुद्धा मिळेल.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम निवासी तसेच अनिवासी या दोन्ही पद्धतीमध्ये उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वर आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) :
https://mced.co.in/Training_Details/?id=7711
कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) :
https://mced.co.in/Training_Details/?id=7712
ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतेवेळी ऑफिसर कोड :20(Kayande Pravin) व *Dist: Kolhapur नमुद करावा तसेच अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रकल्प अधिकारी
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) जिल्हा कार्यालय द्वारा उद्योग भवन, महावीर गार्डन समोर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाजूला कोल्हापूर.
मोबा. नं. 9403078774
येथे संपर्क करावा.