spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeशिक्षणयंदाही बारावीत मुलींची बाजी : पहिल्यांदाच महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लवकर

यंदाही बारावीत मुलींची बाजी : पहिल्यांदाच महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लवकर

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार ता.५ मे रोजी जाहीर झाला. मंडळाने निकालाची माहिती सकाळी पत्रकार परिषदेतून जाहीर केली. प्रत्यक्षात निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. यंदाही निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.

गेल्या काही दिवसांपासून परीक्षार्थी या निकालाची वाट पाहत होते. यंदा पहिल्यांदाच बारावीचा निकाल एवढ्या लवकर लागला आहे. सीबीएसईच्या निकालापूर्वी निकाल लावून महाराष्ट्र बोर्डाने बाजी मारली आहे.

बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४९ हजार ९३२ आहे. प्रथम श्रेणी आणि त्याच्या पुढे गुण मिळालेले ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. तसेच द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्के ते ५९. ९९ टक्के मिळवलेले विद्यार्थी ५ लाख ८० हजार ९०२ आहेत. ३५ टक्के ते ४४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६४ हजार ६०१ आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी यंदा १४ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यंदा मंडळाच्या इतिहासात प्रथमच दहा दिवस आधी झाली. त्यामुळे यंदा निकालही लवकर लागला. कॉपी सापडल्या त्या केंद्रावरील परीक्षेशी संबंधित सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरमार्ग आढळले. ती सर्व केंद्र आता रद्द केली आहे. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने अनेक उपाय केले, असे मंडळाने पत्रकार परिषदेत सांगितले.

विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.​​

* १०० टक्के गुण कुणालाच मिळाले नाहीत.
* १९२९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहेत.
* ४५६२ कॉलेजचा निकाल ९० ते ९९.९९
* ३८ कॉलेजचा निकाल ० टक्के लागला आहे.

* यंदा ‘लातूर पॅटर्न’ फेल, कोकण विभागाने मारली बाजी; राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला

यंदा निकालाचा टक्का घसरला –

यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का १.४९ नं घसरला आहे.

विभागनिहाय निकाल

बारावीचा शाखानिहाय निकाल 

शाखा निकाल
विज्ञान  ९१. ३५ टक्के
कला ८.५२ टक्के
वाणिज्य  ९२.६८ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम ८३.०३ टक्के
आयटीआय  ८२. ०३ टक्के
निकालाची ठळक वैशिष्टये – 
१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.
  • या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
  • खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.
  • कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक –
    * सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.७४.%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ( ८९.४६ %) आहे.
    सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७% ने जास्त आहे.
    एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० % आहे.
  • या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
  • निकालातील महत्त्वाचे मुद्दे –
    १. कॉपी प्रकरणामुळे बारावी परीक्षेत १२४ केंद्रांची परवानगी काढून घेण्यात आली आहे.
    २. यंदा परीक्षेतील गैरमार्गाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा बोर्डाकडून करण्यात आला आहे.
    ३. योग्य पद्धतीने प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची उत्तम सोय केली होती.
    ४. विभागीय मंडळातून एकूण १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ९१.८८ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
    ५. पुनर्परीक्षेचा निकाल- ३७.६५ टक्के आहे
    ६. दिव्यांगाना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
    ७. कोकणची राज्यात बाजी- ९६.९४ टक्के आहे (सर्वोत्तम), लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल
    ९४.५८- मुलींचा निकाल
    ८९.५१- मुलांचा निकाल
  • ———————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments