मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई ते कोल्हापूर धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोल्हापूर ते तिरुपती धावणारी हरिप्रिया एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत मोठे बदल करण्यात आले असून या गाड्या ऑक्टोबरपासून सुधारित स्वरूपात प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत.
सुधारित स्ट्रक्चर असे : एसी फर्स्ट क्लास, एसी सेकंड क्लास, एसी थर्ड क्लास, एसी थर्ड इकॉनॉमी, स्लीपर, जनरल सेकंड क्लास, जनरेटर, सेकंड सिटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन
महालक्ष्मी एक्सप्रेस : ट्रेन क्रमांक १७४११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते कोल्हापूर सुधारित श्रेणींच्या स्ट्रक्चरसह २० ऑक्टोबर पासून सुरू होईल. ट्रेन क्रमांक १७४१२ कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेस सुधारित स्ट्रक्चरसह १९ऑक्टोबर पासून धावेल.
हरिप्रिया एक्सप्रेस : ट्रेन क्रमांक १७४६ कोल्हापूर ते तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस सुधारित स्वरूपात २१ ऑक्टोबर पासून सुरू होईल. ट्रेन क्रमांक १७४५ तिरुपती ते कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस सुधारित डब्यांसह १८ ऑक्टोबर पासून धावेल.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, या गाड्यांच्या तिकिटांचं आरक्षण करताना नवीन डब्यांची रचना लक्षात घ्यावी. या बदलांची सविस्तर माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच एनटीएस अॅपवर उपलब्ध आहे.