नांदेड : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेतून महिलांना मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मासिक मदतीपलीकडे आता मोठा दिलासा देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आता स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी ४०,००० रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्ज कसे मिळेल?
महिलांनी या कर्जासाठी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल.
अर्ज करताना महिलांनी कोणता व्यवसाय सुरू करणार आहेत याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
विशेष म्हणजे, या कर्जाची परतफेड महिलांना त्यांच्या मासिक १५०० रुपयांच्या मदतीतूनच केली जाणार आहे. त्यामुळे महिलांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही.
कर्जासाठी पात्रतेच्या अटी
✅ अर्जदार महिलाचे वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान असावे.
✅ महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
✅ महिलेचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
✅ कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीत नसावे.
✅ कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.
✅ अर्जदार महिलेला लाडकी बहिण योजना वगळता इतर कोणत्याही सरकारी योजनेतून थेट आर्थिक मदत मिळत नसावी.
जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?
लाडकी बहिण योजनेच्या १२ व्या हप्त्याची महिलांना उत्सुकता आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.
“जून महिन्याचा हप्ता लवकरच डीबीटी (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येईल. याच आठवड्यात पैसे खात्यात येण्याची शक्यता आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
या नव्या निर्णयामुळे महिलांना केवळ मासिक मदतीपुरते मर्यादित न ठेवता, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. महिलांनी छोट्या उद्योग, किराणा दुकान, शिवणकाम, शेतीपूरक व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्री यांसारख्या विविध क्षेत्रात हे कर्ज वापरून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.