स्वत:सह समाजाची प्रगती साधते साक्षरता

आज ८ सप्टेंबर, अंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, यानिमित्त...

0
120
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे. आज ८ सप्टेंबर, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. हा दिवस साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि साक्षरतेच्या अभावाशी संबधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी साजरा केला जातो. 

राष्ट्रकुलाच्या ‘युनेस्को’ या संघटनेने १९६५ साली जागतिक पातळीवर साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा केली व त्याच्या पुढील वर्षापासून ८ सप्टेंबरला जगभर ती प्रथा रुढ झाली. ४२ वर्षांपूर्वी ‘युनेस्को’ ने सुरु केलेल्या जागतिक साक्षरता दिनाला अजूनही प्रचंड प्रतिसाद मिळतोय. भारतात सुद्धा या अभियानाचे चांगले फलित दिसून आले असून, एका आकडेवारीनुसार १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा साक्षरता दर हा १२ टक्के इतकाच होता. मात्र बदलत्या काळाबरोबर आपला साक्षरता दर ७४ ते ८० टक्के पर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरतेच्या तुलनेत ही वाढ पुरेशी नाही. युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे माणसाला दैनिक जीवनाशी निगडित बाबीविषयी लिहिता वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे.

साक्षरता म्हणजे केवळ वाचन, लेखन आणि मोजणी येणे एवढेच नव्हे, तर व्यक्तीला आपल्या जीवनात माहिती समजून घेता येणे, वापरता येणे आणि त्यावर योग्य कृती करता येणे.

साक्षरता दिनाचा उद्देश

  • साक्षरतेच्या महत्त्वाची जाणीव वाढविणे
  • साक्षरतेच्या क्षेत्रातील अडचणी, विशेषतः दारिद्र्य, लिंग विचार आणि सामाजिक असमानता यावर प्रकाश टाकणे.
  • सरकार, संस्था आणि लोकांना साक्षरता वाढवण्यासाठी प्रेरित करणे

जागृतीची का गरज 

  • जगात अजूनही कोट्यवधी लोक निरक्षर आहेत.

  • विशेषतः महिला आणि ग्रामीण भागातील लोक साक्षरतेपासून वंचित असतात.

  • साक्षरता हे सामाजिक व आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक आहे.

जगभरात अंदाजे ७७ कोटी लोक निरक्षर आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आहेत. बालकांमध्ये शालेय शिक्षण सोडण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here