कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. आज रात्रीही गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरीही दिवसभरात उष्णता कमी झाली नव्हती. वातावरण दमट होते.
या आठवड्यात रविवार अखेर पर्यंत वादळी वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
२० मे: दुपारी आणि संध्याकाळी गडगडाटी वादळांसह पावसाची शक्यता.
२१ मे: दुपारी आणि संध्याकाळी गडगडाटी वादळांसह पावसाची शक्यता.
२२ मे: दुपारी आणि संध्याकाळी गडगडाटी वादळांसह पावसाची शक्यता.
२३ मे: दुपारी आणि संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता.
२४ मे: दुपारी आणि संध्याकाळी गडगडाटी वादळांसह पावसाची शक्यता.
२५ मे: दुपारी आणि संध्याकाळी पावसाची शक्यता.
सध्याचे हवामान भात, सोयाबीन, नाचणी आणि भूईमूग यांसारख्या खरीप पिकांच्या लावणीसाठी अनुकूल आहे. मात्र, विजेचा गडगडाट व वादळाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.