कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
तळसंदे सारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ठोस योगदान देण्याचे कार्य अधिक ताकदीने सुरु राहील. या विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी विद्यापीठाच्या पाचव्या स्थापना दिन कार्यक्रमाप्रसंगी केले.
हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचा पाचव्या स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गजानन महाराजांच्या पूजनाने करण्यात आली.

डॉ. संजय डी. पाटील- तळसंदे सारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत शिक्षण पद्धती, संशोधन, प्लेसमेंट या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ठोस योगदान देण्याचे कार्य अधिक ताकदीने सुरु राहील. या विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले.
विश्वस्त ऋतुराज पाटील – विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये सर्व सहकारी आणि कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि ग्रुमिंग या तीन गोष्टीवर भर देऊन उत्तम विद्यार्थी घडवण्यावर आमचा भर असून अभ्यासक्रमामध्ये एआयचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर फोकस राहील. येत्या काळात जगातील विविध प्लॅटफॉर्मवर या विद्यापीठाचे जास्तीत जास्त विद्यार्थी दिसतील यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुया आणि विद्यापीठचा नावलौकिक अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करुया.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांमुळे विद्यापीठाची लोकप्रियता राज्यभर पसरली आहे. हे विद्यापीठ ग्रेट एजुकेशन हब बनविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया.
कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले की इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थी उद्योगजगतात तयार होतील. त्यासाठी सर्व अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना एक वर्ष इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे. विदेशातील अनेक कंपन्यांशी सामंजस्य करण्यात आले आहेत.
————————————————————————————