धराली आपत्तीचा धडा घ्यावा

0
87
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

उत्तराखंड राज्यात धराली गावात मागील आठवड्यात जी आपत्तीची घटना घडली ती घटना टाळता आली असती आणि नुकसान तरी कमी झाले असते. येथे या गोष्टीचा उहापोह करण्याची यासाठी आवश्यकता आहे कि, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. हा भाग डोंगर, टेकड्यांचा आहे. येथेही भूस्कलन होणे अशा घटना अधेमध्ये घडत असतात. अशा घटनांचा अभ्यास करणाऱ्या इस्रो सारख्या संस्थांनी संभाव्य आपत्तीची सूचना दिली असेल तर ती जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन आपत्ती टाळण्यासाठी काम करावे.

उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी क्षेत्रात ५ ऑगस्टला धराली भागात ढगफुटी होऊन मोठी आपत्ती कोसळली होती. अशी आपत्ती तेथे कोसळण्याचा इशारा इस्रोच्या (ISRO) वैज्ञानिकांनी एक वर्षापूर्वीच दिली होती. त्यांच्या सेटेलाइट आधारित अध्ययनात स्पष्ट झाले होते की श्रीकंठ पर्वताच्या आसपासच्या घाटीमध्ये, विशेषतः ४ हजार मीटर उंचीपेक्षा वर, पावसाच्या जोरदार आगमनामुळे खूप मोठे नुकसान होऊ शकते. ही माहिती त्यांनी उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागास दिली होती. असे दै. अमर उजाला ने एका वृत्तात म्हंटले आहे.

अमर उजालाला दिलेल्या विशेष मुलाखतीत इस्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितले की त्यांनी ही अहवाल उत्तराखंडच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सुपूर्त केला होता. याबाबत अमर उजालाने सरकारकडून प्रतिक्रिया मागितली, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी अहवालाबद्दल काहीही माहिती नसल्याचेच सांगितले. त्यामुळे तो अहवाल आता कुठं गेला? याचे उत्तर अद्यापही उपलब्ध झालेले नाही 

उत्तराखंडचे  अधिकारी या अहवालाबद्दल निष्काळजीपण दाखवत आहेत. याबाबत वेळीच दखल घेऊन उपाय योजना केल्या असत्या तर   कदाचित इतकी मोठी घटना घडली नसती आणि मोठे नुकसान टाळता आले असते.

———————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here