spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

HomeUncategorizedवाळू पेक्षा जास्त पाणी असलेले वाळवंट तुम्ही ऐकले आहे का ?

वाळू पेक्षा जास्त पाणी असलेले वाळवंट तुम्ही ऐकले आहे का ?

होय अशा प्रकारचे एक प्रसिद्ध वाळवंट म्हणजे लिबिया  देशातील कुफ्रा ओयासिस (Kufra Oasis)इजिप्त आणि चाड देशाच्या सीमे लगत असे काही हायड्रोलॉजिकल बेसिन आहेत. जिथे जमिनी खाली वाळू असून सुद्धा प्रचंड पाणी साठा आहे. याचे स्थान लिबियाचा दक्षिण – पूर्व भाग, सहारा वाळवंटात आहे . प्राचीन काळी  या मार्गावर व्यापारी आणि प्रवासी येथे विश्रांतीसाठी येथे थांबत असत.

कुफ्रा ओयसिस मध्ये center-pivot irrigation ( गोल फिरणाऱ्या सिंचन पद्धती ) वापरुन शेती केली जाते. सॅटेलाइट इमेजेस मध्ये यामुळे हरित वर्तुळ दिसतात.

सॅटेलाइट फोटो

गोल फिरणाऱ्या सिंचन पद्धती

या प्रकारच्या Aquifer चे चांगले उदाहरण म्हणजे न्युबियन सँडस्टोन जलधारा प्रणाली. न्युबियन सँडस्टोन जलधारा प्रणाली (Nubian Sandstone Aquifer System) ही जगातील सर्वात मोठी पाण्याची भूमिगत जलधारा आहे.

ही जलधारा उत्तर आफ्रिकेतील चार देशांमध्ये पसरलेली आहे – इजिप्त (Egypt), लिबिया (Libya), चाड (Chad) आणि सुदान (Sudan) या देशांमध्ये. या जलधारेचे क्षेत्रफळ सुमारे २ दशलक्ष चौरस किलोमीटर आहे, जवळ जवळ भारताच्या आकाराचे आहे. भुगर्भ शास्त्रज्ञानी  या पाण्याला  “फॉसिल वॉटर” (fossil water) म्हणून नाव दिले आहे.  कारण ते अत्यंत प्राचीन असून ते पुन्हा सहज भरून येणारे नाही. ही जलधारा वाळवंटातील भागात पाणीपुरवठा करण्याचा मुख्य स्रोत आहे. इजिप्त आणि लिबिया सारखे देश शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या जलधारेवर अवलंबून आहेत. या वाळवंटात वरकरणी अत्यंत कोरडे हवामान असूनही या जलधारेत असलेले पाणी हजारो वर्षांपूर्वीच्या पर्जन्यामुळे (पावसामुळे) साचलेले आहे. वाळवंट असून सुद्धा शेती शक्य आहे कारण तेथील सरकारने पाणी खेचून शेतीसाठी वापण्याची व्यवस्था केली आहे. हा एक नैसर्गिक विरोधा भास आहे. वरती वाळवंट आणि खाली गोड्या पाण्याचा खजाना.

वळवंटा खालील गोड्या पाण्याच्या स्त्रोत

पण सध्या पाण्याचा अतिवापर केल्याने जलधारेतील पातळी झपाट्याने खाली जात आहे. हे पाणी पुन्हा भरून न येणारे असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

……..दिग्विजय माळकर ( M.SC. Geology )

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments