spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगकोल्हापुरी चप्पल डिझाईनची विदेशी कंपनीकडून कॉपी

कोल्हापुरी चप्पल डिझाईनची विदेशी कंपनीकडून कॉपी

युवराज संभाजीराजें आक्रमक

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

कोल्हापुरी चप्पल हा महाराष्ट्राच्या आणि विशेषतः कोल्हापूरच्या समृद्ध वारशाचा जगभरात दरारा आहे. ही चप्पल केवळ पायातील वस्तू नसून शेकडो वर्षांची परंपरा, कारागिरी आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय फॅशन क्षेत्रात पोहोचणं हा अभिमानाचा मुद्दा असतानाच, प्रसिद्ध विदेशी फॅशन ब्रँड प्राडाने सरळसरळ कोल्हापुरी चप्पलची डिझाईन कॉपी करून स्वतःच्या नावाने बाजारात विक्री सुरू केली आहे. या प्रकाराला युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र शब्दांत विरोध केला आहे.

संभाजीराजे छत्रपती – कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असताना त्या चपलेची खरी ओळख, त्यामागचं सांस्कृतिक वारसातत्त्व आणि कोल्हापूरच्या कारागिरांचे योगदानही जगभर पोहोचायला हवं होतं. शेकडो वर्षे ही कला ज्या कारागिरांनी जोपासली, वाढवली त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. याच उद्देशाने २०१९ साली कोल्हापुरी चप्पलला GI (Geographical Indication) मानांकन मिळालं आहे. जर प्राडा कंपनीने GI मानांकनाच्या नियमांचे पालन करून या चपलेची विक्री केली असती, तर ‘कोल्हापुरी जगभर पोहोचली’ म्हणून आम्ही आनंद व्यक्त केला असता. मात्र, मूळ ओळख लपवून, डिझाईन थेट कॉपी करून स्वतःच्या नावाने विक्री करणे हे केवळ डिझाईन चोरी नव्हे, तर ‘सांस्कृतिक अपहार’ (Cultural Appropriation) चे मोठं आणि दुर्दैवी उदाहरण आहे.

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या काळात कारागिरांना मिळालेल्या राजाश्रयामुळे कोल्हापुरी चप्पल व्यवसायाने फुलंवून आलेला आहे. या परंपरेला जागतिक स्तरावर मान्यता मिळणं ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. मात्र, परदेशी कंपन्यांनी स्थानिक कारागिरांचा आणि त्यामागील परंपरेचा अपमान न करता, त्यांना योग्य ओळख व मोबदला देणं आवश्यक आहे, असा सूर कोल्हापूरात उमटतो आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्राडा कंपनीकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, कोल्हापुरी चप्पल उत्पादक संघटना आणि कारागीरांनीही सरकारकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोल्हापुरी चप्पल हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे. या परंपरेची लूट थांबवण्यासाठी, जागतिक स्तरावर या वारशाचं रक्षण होण्यासाठी शासनाने आणि केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलावी, अशी एकमुखी मागणी आता राज्यभरातून होत आहे.

—————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments