spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगकोल्हापूर औद्योगिक क्षेत्रात 'क्लीन अँड ग्रीन'चा आदर्श : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रात ‘क्लीन अँड ग्रीन’चा आदर्श : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मॅक असोसिएशनच्या वतीने स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली सहा वर्षे औद्योगिक क्षेत्रात सातत्याने राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रात ‘क्लीन अँड ग्रीन’चा आदर्श निर्माण झाल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी काढले.

जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे जतन अत्यावश्यक असून प्लास्टिकमुक्त औद्योगिक वसाहती निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्लास्टिकच्या ऐवजी स्टील बाटल्या व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. उद्योग क्षेत्राने यासाठी पुढाकार घेऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत, असेही ते म्हणाले.

दहा हजार वृक्षलागवडीचा संकल्प –

जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी यावेळी सर्व उद्योजकांना आपल्या कंपन्यांसमोर आणि सार्वजनिक ठिकाणी किमान २० ते २५ झाडे लावण्याचे आवाहन केले. वृक्षांच्या वाढदिवसा प्रमाणे देखभाल केली जावी यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना त्यांनी मांडली. यावर्षी एकूण १० हजार रोपांची लागवड करुन त्याचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

ई-वेस्ट उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाला.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी औद्योगिक क्षेत्रातून मिळालेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आभार मानले. तसेच ई-वेस्ट उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक कामांमध्ये उद्योगजगताचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे’त जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांची राज्यात दुसऱ्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल मॅक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. येडगे यांचा सत्कार करण्यात आला.

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मौर्या ग्रुपच्या सहकार्याने उपलब्ध केलेल्या कामगारांना कापडी पिशव्या व स्टील बाटल्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड म्हणाले, गेली सहा वर्षे झाली कोल्हापूर मधील सर्वच औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम मान्यवर उद्योजक व कामगार बंधू राबवित असून अतिशय उत्साहाने तिन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये काम सुरु आहे. ५ जून जागतिक पर्यावरण दिन व २ ऑक्टोंबर गांधी जयंती या दोन्ही दिवशी हजारो उद्योजक व कामगार बंधू आपआपल्या परीने कारखान्याच्या आतील व बाहेरील तसेच आसपासचा परिसर स्वच्छ करतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. पंचगंगा प्रदूषणच्या अनुषंगाने उद्योजकांच्याकडून अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला असून उद्योजकांनी त्याबाबत योग्य उपाय योजना केल्यामुळे प्रदूषण मुक्त झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे म्हणाले, असोसिएशनच्या माध्यामातून पर्यावरण दिन व वृक्षारोपण हे दोन्ही उपक्रम गेली ६ वर्षे झाली आम्ही राबवित असून त्याचे सातत्य ठेवले आहे. गेली १७ वर्षे झाली मान्यवर उद्योजक, कामगार वर्ग यांच्या करिता विविध उपक्रम राबवित असून सामाजिक क्षेत्रात देखील उत्कृष्ट असे कार्य असोसिएशन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वमालकीचा भूखंड अद्यावत अशी वास्तू उभारणी करणे, “फाईव्ह स्टार न्यूज” मासिक, अद्यावत असे “कॅन्टीन”, केएमटी बस सेवा, शतकोटी वृक्षलागवड, मॅक चौक येथे अद्यावत अशी “पोलीस चौकी”, रक्तदान, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, हेल्थ चेकअप कॅम्प, पूर परस्थिती मध्ये नवीन बोट, पूर परिस्थिती आर्थिक मदत धान्य कीट व खाद्यपदार्थ वाटप, लक्ष्मी टेकडी ते हुपरी मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते तसेच हायमास्ट व एलईडी दिवाबत्ती बसविणे, कोरोना पार्श्वभूमीवर लसीकरण, जीवनावश्यक धान्य कीट व शिवभोजन थाळीचे वाटप, कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय सेवेकरिता सेवा दवाखाना (ESI Hospital), उद्योजकांच्या सहकार्यातून मॅक चौक लक्ष्मी टेकडी ते हुपरी सुशोभिकरण, महापारेषण विभाग १०० एमव्हीए व महावितरण १० एमव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित, कुशल कामगार कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा या हेतूने “कौशल्य विकास केंद्राची” लवकरच उभारणी, तीन ते चार ठिकाणी महावितरणकडून नवीन सबस्टेशन, ट्रक पार्किंग करिता ट्रक टर्मिनल / वाहनतळ, मॅक चौक ते पट्टणकोडोली रस्त्याचे कामकाज पूर्ण, औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे इत्यादी कामांचा पाठपुरावा करणे व कामे पूर्ण करण्याकरिता संबंधित अधिकारी वर्ग यांना भेटून पूर्ण करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून झाले आहे.

लवकरच असोसिएशनच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र व अद्यावत वास्तू उभारण्यात येणार असून नॅशनल हायवेवरील लक्ष्मी टेकडी येथे होणाऱ्या ओव्हरब्रिज संदर्भात तातडीची बैठक घेण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आली.

कार्यक्रमास प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक, मऔवि महामंडळ, प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, मप्रनि महामंडळ, उदय गायकवाड (पर्यावरण तज्ञ), अग्निशमन अधिकारी मिलिंद सोनवणे, मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, गोशिमा अध्यक्ष स्वरुप कदम, संचालक दीपक चोरगे, मॅकचे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर अमृतराव यादव, संचालक अशोक दुधाणे, संजय जोशी, संजय पेंडसे, हरिश्चंद्र धोत्रे, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील, शिवाजी भोसले, संगमेश पाटील, सत्यजित सावंत, अभिजीत पाटील, बाळासाहेब धुळूगडे, मऔवि महामंडळ अधिकारी, कर्मचारी, तसेच रेमंड, मोर्या ग्रुप, मार्व्हल्स ग्रुप, मेनन ग्रुप, किर्लोस्कर ग्रुप, इंडो काऊंट ग्रुप, मान्यवर उद्योजक, कंपनी प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मऔवि महामंडळचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांनी मानले.

————————————————————————————–

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments