प्रसारमाध्यम डेस्क
भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने अचानक निवृत्तीचा निर्णय घेऊन आपल्या चाहात्यानां एक धक्काच दिल आहे. यापुढे विराट कोहली कसोटी सामने खेळणार नाही. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने हा निवृत्तीचा निर्णय घेताना बीसीसीआय च्या अधिकाऱ्यांशी कसलीही चर्चा केलेली नाही. यामुळे विराटची ही निवृत्ती चर्चेचा विषय बनत आहे.
विराट कोहली बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेणीच्या मानसिकतेत होता, अशी क्रिकेट क्षेत्रात चर्चा होती. त्याचा हरवलेला फॉर्म , दौऱ्यावर खेळाडूंच्या कुटुंबियांसाठी बीसीसीआयने केलेले कडक नियम आणि भारतीय संघाची नवीन संघ बांधणी या काही कारणांमुळे विराट कोहली नाराज असल्याचे बोलले जात होते. अखेर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतलाच पण हा निर्णय घेण्यापूर्वी त्याने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानां विचारात घेतलेलं नाही. त्याने काही वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा करून हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे.
विराट कोहलीला कसोटी क्रिकेट मध्ये १०००० हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या ७५२ धावा कमी असताना त्याने हा निवृत्तीचा निर्णय का घेतला? असा प्रश्न त्याच्या चाहात्यानां पडला आहे. सध्यातरी त्याच्या निवृत्तीची कारणं गुलदस्त्यातच आहेत..
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द थोडक्यात पाहू..
कसोटी पदार्पण : जून २०११, वेस्ट इंडीजविरुद्ध
खेळलेले सामने: ११३ (मे २०२५ पर्यंत)
एकूण धावा: ८८४८
सरासरी ४९
शतकं: २९
अर्धशतकं: ३० पेक्षा जास्त
सर्वोत्तम धावसंख्या : २५४ नाबाद (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, २०१९ )
कर्णधार म्हणून कसोटी सामने: ६८
कर्णधार म्हणून विजय: ४० (भारतात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा कर्णधार)



