राधानगरी : प्रसारमाध्यम न्यूज
राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली कासारपुतळे या ठिकाणी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध मोहिमांची प्रात्यक्षिके तानाजी खाडे यांच्या शेतात शेतकऱ्यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
प्रात्यक्षिकांमध्ये भात बीज प्रक्रिया करत असताना घरचे भात बियाणे म्हणून वापरावयाचे झाल्यास तीन टक्के मिठाच्या द्रावणाची, त्यानंतर थायरम किंवा कार्बनडिझीम बुरशीनाशक एक किलो बियाण्याकरता तीन ग्रॅम त्यानंतर अझोटोबॅक्टर एक किलो बियाण्यास अडीच ग्रॅम या पद्धतीने बीज प्रक्रिया करावी तसेच उसावरील अत्यंत महत्त्वाची आणि मुख्य कीड हुमणी नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे त्यामध्ये प्रकाश, सापळे, एरंड, आंबवन सापळे, कामगंध सापळे यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सरपंच सुनीता पोवार, ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेतकरी तसेच मंडळ कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे कृषी पर्यवेक्षक डी बी आदमापुरे आणि कृषी सहाय्यक एस बी चौगले आदी उपस्थित होते.