कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर 2’ ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. या चित्रपटानं सुरुवातीच्या विकेंडला भरपूर कमाई केली आहे. २०२५ ला प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना त्याने मागे टाकलंय.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसाठी २०२५ हे वर्ष अत्यंत कमालीचं ठरणार, असंच दिसतंय. या वर्षात आतापर्यंत खिलाडी कुमारचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्ही धुवांधार चालल्याचं पाहायला मिळालं आहे. जानेवारी महिन्यात खिलाडी कुमारच्या ‘स्काय फोर्स’ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अशातच आता अक्षय कुमारचा नवा चित्रपट ‘केसरी चॅप्टर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘केसरी चॅप्टर 2’साठी प्रेक्षकांची झुंबड उडाली आहे. ‘केसरी चॅप्टर 2’ नं रिलीज होताच पहिल्या आठवड्याच्या शेवटी किती कमाई केली? हे सविस्तर जाणून घ्या…
‘केसरी चॅप्टर 2′ नं तिसऱ्या दिवशी किती कमावले ?
‘केसरी चॅप्टर 2’ हा २०२५ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होती, ज्यामुळे असं वाटत होतं की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल. थिएटरमध्ये दाखल झाल्यानंतर, ‘केसरी चॅप्टर 2’ नं प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर या चित्रपटाचं खूप कौतुक झालं. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सुरुवात मंदावली असली तरी, ‘केसरी चॅप्टर 2’ नं विकेंड गाजवल्याचं पाहायला मिळालं. जर आपण भारतात चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या मते,
- ‘केसरी चॅप्टर 2’नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 7.75 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 25.81 टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याने 9.75 कोटी रुपये कमावले.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘केसरी चॅप्टर 2’ नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे, रविवारी 12.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
- यासह, ‘केसरी चॅप्टर 2’ चं तीन दिवसांत एकूण कलेक्शन आता 29.75 कोटी रुपये झाले आहे.
-
‘केसरी चॅप्टर 2’ नं 2025 च्या 11 चित्रपटांचा विक्रम मोडला
‘केसरी चॅप्टर 2’ नं सुरुवातीच्या वीकेंडलाच धुमाकूळ घातला आहे. यासह, या चित्रपटाने 2025 च्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी चावा (121.43 कोटी), सिकंदर (86.44 कोटी), स्काय फोर्स (73.20 कोटी) आणि जाट (40.62 कोटी) वगळता सर्व चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या कमाईला मागे टाकले आहे. 29.75 कोटींच्या कलेक्शनसह, ‘केसरी चॅप्टर 2’ हा 2025 च्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट बनला आहे. कोइमोईच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटानं 2025 च्या या 11 चित्रपटांच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनला मागे टाकलं आहे.
- गेम चेंजर: 26.59 कोटी
- देवा: 19.43 कोटी
- द डिप्लोमॅट: 13.45 कोटी
- इमरजेंसी: 12.26 कोटी
- फतेह: 10.71 कोटी
- बॅडएस रवि कुमार: 9.72 कोटी
- मेरे हसबँड की बीवी: 5.28 कोटी
- लवयापा: 4.75 कोटी
- आजाद: 4.75 कोटी
- क्रेजी: 4.25 कोटी
- सुपर बॉयज ऑफ मालेगांव: 1.82 कोटी
- —————————————————————————-



