कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ‘ कृषी ड्रोन कर्ज योजना ’ सुरू केली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील तरुण, सहकारी संस्था तसेच कृषी पदवीधरांना मोठा दिलासा मिळणार असून, शेती अधिक आधुनिक, जलद आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
योजनेत काय मिळेल ?
-
ग्रामीण तरुण आणि सहकारी संस्थांना ४ लाखांपर्यंत कर्ज व अनुदान.
-
कृषी पदवीधरांना ५ लाखांपर्यंत अनुदान.
-
बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या कृषी ड्रोनची किंमत साधारणतः १० ते १२ लाख रुपये असल्याने या अनुदानामुळे मोठा दिलासा.
-
कर्जफेडीसाठी ५ वर्षांची मुदत, दहा समान हप्त्यांमध्ये परतफेड करण्याची सोय.
पात्रता निकष
-
किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण युवक.
-
रिमोट तंत्राचे प्रशिक्षण घेतलेले ग्रामीण भागातील तरुण.
-
सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था आणि शासकीय संस्था पात्र.
अनुदानाचा तपशील
-
शेतकरी उत्पादक संस्थांना ७५% अनुदान किंवा जास्तीत जास्त ७.५ लाखांपर्यंत मदत.
-
शासकीय संस्थांना १००% अनुदान, म्हणजेच १० लाखांपर्यंत संपूर्ण आर्थिक मदत.
योजनेची उद्दिष्टे
-
शेतकऱ्यांचा वेळ व पैशांची बचत – ड्रोनद्वारे खते, कीटकनाशके आणि पाणी एकसमान व अचूक प्रमाणात फवारणी.
-
पीक उत्पादन वाढ – खत व औषधांचा योग्य वापर झाल्याने पीक निरोगी व तगडे.
-
ग्रामीण तरुणांना रोजगार – सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधरांना ड्रोनद्वारे व्यवसायाची नवी दिशा.
-
सरकारी अनुदानातून आर्थिक मदत – शेतकऱ्यांवरील कर्जाचा व खर्चाचा ताण कमी.
-
संसाधनांचा कार्यक्षम वापर – खते, पाणी, कीटकनाशके, बुरशीनाशक यांचा योग्य व कमीतकमी वापर.
-
पीक विमा प्रक्रियेत मदत – ड्रोनद्वारे मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे नुकसान भरपाई सोपी.



